Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

पत [ प्रत्ययः ( वचन Credit ) = पत = प्रतीति ] प्राणादपि प्रत्ययो रक्षितव्यः ( कौटिल्य )

पतंग [ पत्रांग = पतंग ( रक्तचंदन ) ] वृक्षविशेष. (भा. इ. १८३७)

पंती [ पणास्त्री harlot = पंती ] ही पंती दिवे लावणार this harlot will make a mess.

पत्तन [ पतन हा शब्द संस्कृत नाही. प्राकृत आहे. प्रस्थान ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश पट्टण व त्याचा अपभ्रंश पत्तन असावा. पट्टण व पत्तन हे दोन्ही अपभ्रष्ट प्राकृत शब्द पुढें संस्कृतांत जसेच्या तसे घेतले गेले, असें दिसतें. ] (भा. इ. १८३२)

पत्ती [ पक्तिः = पत्ती ] पत्तीचीं पानें म्हणजे विड्याचीं चांगलीं पक्कीं पिकविललीं पानें.

पत्नी - येथें नी हा स्त्रीलिंगी प्रत्यय लागला आहे. इंद्र ह्याचें. स्त्रीलिंग इंद्राणी. येथें नी प्रत्यय आहे. तो च नी प्रत्यय पति या शब्दाला लागून पतिनी असें पूर्ववैदिक रूप होत होतें. ह्या पतिनी शब्दाचा वैदिक अपभ्रंश पत्नी. इंद्रभर्व० इत्यादि सूत्राच्या पुढें पाणिनीनें पत्नी हा शब्द साधण्यास, खरें म्हटलें असतां, एक सूत्र द्यावयाचें होतें व तेथें असें सांगावयाचें होतें कीं, पति ह्या शब्दाला नी हा स्त्रीप्रत्यय लागतांना त्याच्या टि चा लोप होतो. (भा. इ. १८३४)

पत्राज, पत्राजा [प्रत्रसा = पत्रसा = पत्राझा = पत्राज ] पत्राज म्हणचे भय. (भा. इ. १८३४)

पथक [ पत्तीनां समूहः पत्तं । पत्तमेव पत्तकं, पत्तकं = पथक ] पथक म्हणजे पाइकांचा समूह.

पथारी [ प्रस्तारी ] ( धातुकोश-पथार पहा)

पदर [ प्रदर (प्रदृ म्हणजे प्रकर्षानें फुटणें) = पदर ] मुलीला पदर आला म्हणजे प्रदर आला म्हणजे रजःस्राव झाला. (भा. इ. १८३६)

पदोपदों [ पदे पदे = पदोपदीं ]

पंधरवडा [ पंचदशावर्त (क)=पन्हरावडअ=पंधरावडा = पंधरवडा. पंधराव्या दिवशीं ज्या कालमानांत त्याच दिवसाची आवृत्ति होते तो पंधरवडा. अशिष्ट लोक पंधरावडा असा उच्चार करतात. (भा. इ. १८३३)

पंधरा [पंचापरदशन्] ( अकरा २ पहा)

पंनास [पंचाशत्] (विंशति पहा)