Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पट्ट [ पट्ट हा शब्द प्राकृत आहे, संस्कृत नाही; प्राकृतांतून संस्कृतांत घेतलेला आहे. मूळ शब्द पत्र. त्याचें प्राकृत पट्ट. पत्र शब्द पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी. पैकीं पुल्लिंग पट्ट या शब्दाच्या वांट्यास आलें. ]
ताम्रपत्र = ताम्रपट्ट. पत्रवर्धन = पट्टवर्धन, पत्राभिषेक = पट्टाभिषेक. पत्रराज्ञी = पट्टराणी. पत्र = पत्त = पात ( एक प्राकृत रूप ). पत्र = पट्ट ( दुसरें प्राकृत रूप ); पैकीं दुसरें रूप पुन्हा संस्कृतांत घेतलें गेलें. (भा. इ. १८३३)
पट्टा [ प्रत्यायः tax, revenue, toll = पट्टा ] tax. पट्टा भरणें to pay tax.
पट्पट् [ पट् शब्द करणें. द्विरुतीनें पटपट. बोलण्याप्रमाणें जलद ] (ग्रंथमाला)
पठार १ [ प्रस्तार (forest abounding in grass) = पठार ]
-२ [ प्रस्थाहार = पठ्ठाआर = पठार ] table-land प्रस्थे सानौ (क्षीरस्वामी-अमर-द्वितीयकांडवनौषधिवर्ग-श्लोक ७९ टीका). पठार म्हणजे डोंगराच्या माथ्यावरील प्रदेश. (भा. इ. १८३४)
-३[ पृष्ठ ह्याचें प्राकृत व मराठी पाठ. विस्तीर्ण पाठ म्हणजे पाठार = पठार ] डोंगराची विस्तीर्ण पाठ म्हणजे डोंगरपठार. (स. मं. )
पठ्ठा [ स्था १ स्थाने. प्रतिष्ठापकः = पडिठ्ठावअ = पठ्ठा ] आमचा पठ्ठ्या = अस्मत्प्रतिष्ठापक: पठ्ठ्या १ [ पटिष्ट: ( अतिशय पटु) - पठ्ठ्या ]
-२ [ पष्टवाह् = पठ्ठ्या = पठ्ठ्या. षष्टवाह् (वैदिक) म्हणजे चार वर्षांचा बैल ] पष्टवाह् म्हणजे ओझें वाहून नेण्याला किंवा नांगर ओढण्याला योग्य असा चार वर्षांचा बैल. त्यावरून कामकर्त्या तरुण माणसाला लक्षणेनें पठ्ठ्या म्हणतात. (भा. इ. १८३५)
पडखाणें [ ईक्ष् १ दर्शने. प्रतीक्षा = पडिखा = पडखा ] प्रतीक्षस्व क्षणं = क्षणभर पडखा.
पडखा म्हणजे वाट पहा. पड आणि खा असे दोन शब्द नाहींत. पडखा असा एक शब्द आहे. पडखाणें हें सबंद क्रियापद आहे. प्रतीक्षणं = पडिखाणें = पडखाणें. (धा. सा. श.)
पडगें [ परिघः = पडिघ = पडगें ]
परिघ म्हणजे खळे, कुंपणा.
पडघम [ पटहं = पडघम. -- = म ] म.धा.१५