Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश

गणबा [ गणपाल ] (धणबा पहा)
गणंभट - बहुतेक सर्व भिक्षुकांच्या नांवांत मकार विकल्पानें उच्चारतात. त्या बहुतेक ठिकाणीं तो अनुस्वार अण्णा = अण्ण = आण् = ण् = अनुस्वार अशा परंपरेनें आलेला आहे.
उदाहरणें:-गणभट व गणंभट, नानाभट व नानंभट, 
तात्याभट व तातंभट, बजाभट व बजंभट, 
कृष्णभट व कृष्णंभट 
गणाण्णाभट = गणणभट = गणंभट 
नानाण्णाभट = नानणभट = नानंभट 
कृष्णाण्णाभट = कृष्णणभट = कृष्णंभट इ. इ. इ. ( भा. इ. १८३४ ) 

गवि - ( युधि पहा )

गागा (भट्ट) [ गार्ग्यः = गाग्गा = गागा ] हें घरचें आवडतें नांव आहे. (भा. इं. १८३३)
गांधारी - गंधर्व या शब्दाचें प्राकृत गांधार अथवा गंधार. गंधार या शब्दाचें पैशाची प्राकृत खंदार. खंदार हा शब्द मराठी ऐतिहासिक पत्रांतून व बखरींतून येतो. गांधारी हा शब्द प्राकृत आहे. तो भारतांत येतो. त्या अर्थी प्राकृत भाषा प्रचलित झाल्यावर भारत झालें हें स्पष्ट आहे. (भा. इ. १८३२)

गुण्या [ गुण्यः = गुण्या (पुरुषनाम)] (भा. इ. १८३४) 

गोणाबाई [ गोणा (संस्कृत स्त्रीनाम)= गोणा (स्त्रीनाम) ] (भा. इ. १८३४) 
[ गोणा (विशेषनाम)= गोणा. व्द्याश्रयमहाकाव्य-४-५१ ] 
गोमा १ [ गोतमः = गोयमा = गोमा ( विशषनाम )] (भा. इ. १८३६ ) 
-२ [ गोमान् गोमी (अमर-द्वितीयकांड-वैश्यवर्ग-५८ ) गोमान् = गोमा ] गोमाजी बिन तिमाजी, व गोमा गणेश ह्या शब्दांतील गोमा हा शब्द गोमान् ह्या संस्कृत शब्दापासून निघाला आहे. (भा. इ. १८३३)

गोरा कुंभार [ गोरभ (proper name ) = गोरा ] गोरभ हें नांव पूर्णभद्राच्या पंचतंत्रांत तंत्र १ कथा ३ यांत आलें आहे.

ग्यानी, ग्यानू [ ज्ञानदेव ] (नानू १ पहा) 

चुडामण [ चूड़ामणि = चुडामण ] 

छगन [ शकुनि = छगुनि = छगन ( विशेषनाम ) ] (भा. इ. १८३६) 

जजावा [ ययाति = जजाबां, जिजाबा ( व्यक्तिनाम) ]