Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

४२ परस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांची साधनिका :

साधनिका करण्यापूर्वी, थोडासा उपोद्घात करणे जरूर आहे. मागे तद्, एतद्, इदम्, अदस् या सर्वनामांसंबंधाने विवेचन करताना सांगितले होते की, अदस् हे सर्वनाम अ + तत् = अ + दस् (त चा द व त् चा स् पर्याय होऊन) अशारीतीने सामासिक आहे. त्या विवेचनात असेही सांगितले होते की, इदम्, यनद् व अ, अशी तीन इदमर्थक सर्वनामे पूर्ववैदिकभाषात असत. इदमर्थक अ सर्वनाम सन्निकृष्ट पदार्थ दाखवी. अ म्हणजे हे व दस् = तस् = तत् म्हणजे परोक्षार्थदर्शक ते. अदस् म्हणजे हे ते, परोक्ष पदार्थांहून अलीकडले. अदस् जसे सामासिक सर्वनाम आहे, त्याप्रमाणे इदम् सर्वनामही दोन शब्दांचा समास होऊन झालेले आहे. इ + तम् = इदम्. इ म्हणजे समीपतम ह्न वृत्ती पदार्थ आणि तम् म्हणजे परोक्षवर्ती पदार्थ. इतम् = इदम् म्हणजे समीपतमवार्ती पदार्थ दर्शक सर्वनामशब्द. अदस् व इदम् या दोन जोड सर्वनामांप्रमाणे, एतद् हेही सामासिक ऊर्फ जोड सर्वनाम आहे. ए + तत् = एतद्. ए म्हणजे समीपतरवर्ती पदार्थदर्शक शब्द आणि तत् म्हणजे परोक्षार्थदर्शकसर्वनामशब्द. एतत् ह्न एतद् म्हणजे (समीपतरवर्त्तिपदार्थदर्शक सर्वनाम शब्द) जवळचे हे ते. इदम्, एतद् व अदस् या तीन जोड सर्वनामांच्या आद्यस्थानी इ, ए व अ हे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ समीपतम, समीपतर व समीप असा उत्तरोत्तर कमतर समीपत्व दाखविणारा आहे. इ म्हणजे अगदी निकटवर्ती पदार्थ. ए म्हणजे इ हून दूरचा व अ हून जवळचा पदार्थ आणि अ म्हणजे इ व ए यांच्याहून दूरचा परंतु त् हून अलीकडला पदार्थ. त् म्हणजे अगदी दृष्टीपलीकडील परोक्ष पदार्थ. त् च्या मानाने अ जवळचा व इ आणि ए यांच्या मानाने अ दूरचा. तात्पर्य अ चे सापेक्षत्वाने दूरचा व जवळचा असे दोन अर्थ असत. येणेप्रमाणे अ, इ व ए असे तीन शब्द कमी-जास्त सामीप्य दाखविणारे पूर्ववैदिकभाषात असत. इदम्, एतद् व अदस् या तीन सर्वनामांच्या आद्यस्थानी असणाऱ्या अक्षरांचा अर्थ कमी-जास्त अंतर दाखविणारा ज्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे या तीन सर्वनामांचे द्वितीय अक्षर जे त् तेही अंतर दाखविणारेच आहे. त् हे सर्वनाम सगळ्यांहून अत्यंत जास्त अंतर ऊर्फ दूरीभाव ऊर्फ पारोक्ष दाखविते. इदम्, एतत् व अदस् या तीन जोड सर्वनामांत त् हे बीजाक्षर आहे. या वैजिक त् सर्वनामाची एकवचनी, द्विवचनी व बहुवचनी रूपे पूर्ववैदिकभाषात धातूंना स्वतंत्र लावीत आणि दूरीभाव कमी कर्तव्य असल्यास तू सर्वनामाच्या पाठीमागे, अ हा सामीप्यदर्शक शब्द उपसर्गाप्रमाणे लावून, नंतर तो अत् जोड शब्द धातूंना लटकावून देत. हा उपोद्घात करून, परस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांच्या साधनिकेला लागतो.