Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
७ सातवी बाब : उत्तम पुरुषाच्या एकवचनी इतकी पाच सर्वनामे पूर्ववैदिकभाषात का असावी? तर तत्कालीन वस्तुस्थिती येणेप्रमाणे होती. रानटी आर्यांच्या लहानलहान टोळ्या अशा प्रदेशात रहात असाव्या की, जेथे दळणवळणाला फार अडचण पडे व टोळ्यांची जीवितयात्रा, पिढ्या न् पिढ्या हजारो किंवा शेकडो वर्षे एकमेकांचा फारसा स्पर्श व घसट न होता, संथपणे चाले. त्यामुळे प्रत्येक दरीतील रानटी आर्यांच्या प्रत्येक टोळीच्या भाषेत विशिष्ट प्रकार रूढ होऊन विशिष्ट प्रांतिक किंवा टोळिक भाषा जन्मास आल्या. पुढे या टोळया एक झाल्यावर, सर्व टोळ्यांच्या भाषांचा ठसा संमिश्र समाजाच्या भाषेत सहजच उतरला. मूलत: अत्यंत प्राचीनतम काळी सर्व रानटी आर्यांचा एक समाज होता. तो इतर अनार्य समाजाच्या रेट्यामुळे गगनचुंबित पर्वताच्या दऱ्यांत शिरला. त्यामुळे त्या रानटी आर्यांच्या टोळ्या झाल्या. त्या टोळ्या दऱ्यांतून पंजाबाच्या मैदानात येत असता एक होऊन वैदिकसमाज जन्मास आला. असा एकंदर स्थूल इतिहास दिसतो.
द्विवचन परस्मै
व, वह् आणि आवह्, ही तीन रूपे परस्मै द्विवचनात येतात. अह् या सर्वनामाला स् उपसर्ग दोनदा लागून द्विवचन होत असे :
स्+स्+अह्= अ+ ह+ अह्= अउ +अह = औ+अह = आवह् =भाव
स्+स्+अह=ह्+ह्+अह्=उ+उ+अह्=वह्=व
बहुवचन परस्मै
म, मह् ही दोन रूपे येतात. अहम् या सर्वनामाचे अस्मह् हे अनेकवचनी रूप मागे दिले
आहे त्यावरून
अस्मह् = आमह् =आम
अस्मह् = (अलोप) स्मह् = हमह् = मह् = म