Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

१७ पति व स्त्री हे दोन शब्द एकाच स्त्यै संघाते या धातूपासून निघालेले असून, घर करणारे स्त्रीपुरुष असा याचा अर्थ आहे. गृहात किंवा पस्त्यांत गृयाग्नि ठेविण्याची चाल रानटी आर्यात फार पुरातन कालापासूनची आहे. सबब, पति व स्त्री या व्यक्तींची योग्यता आर्यसंस्कृतीत अतोनात गणिली आहे. कारण, त्या दोघांचे मुख्य काम अग्नि रक्षण करणे हे असे. स्त्यृ चे स्त्रीलिंग स्त्री म्हणून सांगितले. तसे पस्त्यृ चेही स्त्रीलिंगी रूप असे. पस्त्यृ चा शेवटचा अपभ्रंश जो पति शब्द त्याचे स्त्रींलिंग पत्नी होते म्हणून पाणिनी सांगतो. येथे असा प्रश्न उभा रहातो की, पत्नी शब्दांत न काय म्हणून एकाएकी आला ? पत्यू र्नो, या सूत्रांत पाणिनी सांगतो की, स्त्रियाम् न होतो. होतो हे कुकुले बाळही सांगेल. का होतो? या प्रश्नाच्या उत्तर द्यावयाला जुनाट पूर्ववैदिक भाषेकडे वळले पाहिजे. पतय् शब्दाला आनी प्रत्यय लागून जुनाट भाषेत पत्यानी असे. स्त्रींलिंगी रूप होत असे. इंद्रवरुणभर्वादी शब्दांना जसा आनौ प्रत्यय लागतो तसा पतय् शब्दाला आनी प्रत्यय लागे, पत्यानी शब्दाचा अपभ्रंश पत्नी. परनी यातील नीवरून दिसते की जितका इद्रं देव आर्यलोकात जुनाट तितकाच किंवा त्याहूनही जास्त पस्तृ, पत्य् ही व्यक्ति आर्यलोकात जुनाट. वैदिककाली यज्ञसंयोग असे इतर गौण स्त्रियांना भार्या वगैरे इतर संज्ञा असत. पत्नी ही पस्त्य म्हणजे घर व घराकतील अग्नी चालविणारी व राखणारी पति इतकीच प्रधान असे हे वर दाखविलेच आहे, तेव्हा यज्ञ आणि पत्नी यांचा बोलण्यात नित्य संयोग असावा, यात नवल नाही. इतकेच नव्हे, तर पति हा पुल्लिंगी शब्द मालक या अर्थी स्त्रीला वैदिककाली लागत असे व चमत्कार म्हणून तो पाणिनीने गृहपति: स्त्री असा नमूद केला आहे. चमत्काराचे कारण पाणिनीला माहीत नव्हते. पूववैदिककालीन एक समाज बोलण्यात व भाषेत लिंगभेद करीत नसे, स्त्रीशब्दांना व पुंशब्दांना एकच प्रत्यय लावीत असे. या लिंगविहीन भाषेचा अवशेष गृहपति:, मनु:, इत्यादी रूपाच्या आकाराने भाषेत राहिलेला पाणिनीने दाखल केला आहे.