Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
वधू शब्द नदीप्रमाणे, भस्थानी स्या, स्यै, स्यास्, स्योस्, स्याम्, स्यु हे प्रत्यय येतात. पैकी स्यास् व स्यै हे प्रत्यय नवीन आहेत. बाकीचे प्रत्यय अजन्त व व्यंजनान्त पुल्लिंगी प्रत्ययासारखे दिसणारे आहेत. नदी शब्दाची ही प्रथमैकवचनाची दोन, प्रथमा द्विवचनाची दोन व प्रथमा त्रिवचनाची तीन रूपे येतात. अर्थात् ही तीन रूपे योजणारे पूर्ववैदिककाली तीन समाज होते, हे नदी शब्दाच्या रूपावरूनही सिद्ध होते.
१५ पाणिनीयकाली मति व वधु हे इकारान्त व उकारान्त शब्द स्त्रीलिंगी समजत. पूर्ववैदिककालीं एक समाज इकारान्त व उकारान्त स्त्रीवाचक शब्द पुल्लिंगी समजे व दुसरा स्त्रीलिंगी समजे. या दोन समाजाचा वैदिककाली मिलाफ झाला आणि इकारान्त व उकारान्त स्त्रीवाचक शब्दांची स्त्रीलिंगी व पुल्लिंगी अशी दोन्ही रूपे कित्येक ठिकाणी वैदिकभाषेत शिरली. जसे:
बाब इतकी उघड आहे की, जास्त टीका करण्याची जरूर नाही. मतिचे पुल्लिंगी हरि शब्दाप्रमाणे मतौ व स्त्रीलिंगी नदी शब्दाप्रमाणे मत्याम् अशी दोन रूपे का व्हावीत याचा आचंबा प्रथमदर्शनी वाटतो. परंतु पूर्ववैदिककाली मति व धेनु हे शब्द पुल्लिंगी मानणारे काही लोक होते व स्त्रीलिंगी मानणारे काही लोक होते हा इतिहास कळला म्हणजे अचंब्याचे भर्यवसान समाधानात होते.