Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
तन्न्व् : तन् हे दोन धातू आर्धधातुकांत व सार्वधातुकात जसे चालतात, तसे सुन्व् ह्न सु असे दोन धातू आर्धधातुकात व सार्वधातुकात कसे चालतात ते पहावयाचे असल्यास, तनोति, ततान यांच्याप्रमाणेच सुनोति सुषाव ही रूपे आहेत हे लक्षात ठेवावे. शिवाय तन्विरे व सुन्विरे हे ततन्विरे व सुषुन्विरे या पूर्ववैदिक लिटांचे संक्षेप आहेत हेही स्मृतीतून जाऊ देता कामा नये. यापासून निगमन असे प्राप्त होते की, सु व सुन्व् आणि तन् व तन्न्व् असे दोन भिन्न धातू आहेत. सु ह्न सवति, सुन्व् ह्न सुनोति; तन् ह्न तनति, तन्न्व् ह्न तनोति; अशी सु व सुन्व् आणि तन् व तन्न्व् या धातूंची रूपे पृथक्पृथक् आहेत. पैकी सुन्व् व तन्न्व् हीं अंगे फार जुनाट असून, पाणिनीयकाली ती स्वतंत्र अंगे म्हणून स्मृतीतून नष्ट झाली. स्वादि व तनादि धातूंची सुन्व् व तन्न्व् ही अंगे पूर्ववैदिक यङ्लुक्च्या अनुनासिक रूपांचे संक्षेप आहेत, हे रूधादि व ऋयादि गणांवरील विवेचनावरून दिसून येईल.