Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

ब्रूवे या रूपात सामीप्यदर्शक अ व प्रत्यक्षत्वदर्शक इ ही सर्वनामे आहेत आणि ब्रूते या रूपात परोक्षदर्शक त् हे सर्वनाम जास्त आहे. हाच प्रकार लङ् च्या प्रथमपुरुषी एकवचनी दृष्टीस पडतो. अदुह हे लङ् च्या आत्मनेपदी प्रथम पुरुषी एकवचनाचे रूप आहे. अदुग्ध या रूपात त् +अ अशी दोन सर्वनामे आहेत. पण अदुह या रूपात एकटे अ सर्वनाम आहे. अदुग्ध म्हणजे तो (त्) हा स्वत: (अ) दूध काढता झाला आणि अदुह म्हणजे हा स्वत: (अ) दूध काढता झाला. लोट् च्या प्रथमपुरुषी एकवचनी दुग्धाम् व दुहाम् अशी रूपे येतात. दुग्धाम् म्हणजे तो (त्) अ (आज्ञार्थक आगम) स्वत: हा (अम्) दूध काढो. दुग्धाम् म्हणजे तो हा स्वत: दूध काढो व दुहाम् म्हणजे हा स्वत: दूध काढो. कर्मणि लुङ्च्या प्रथमपुरुषीं एकवचनी अकारि, अजनि, अपादि, जानि, पादि, चेति अशी रूपे येतात. या रूपात सामीप्यदर्शक व आत्मत्वदर्शक असे फक्त इ हे एकच सर्वनाम योजिले आहे. अदुह या रूपात जसे एकटे अ हे सर्वनाम योजिले आहे किंवा हन् (त्) या रूपात जसे एकटे त् हे सर्वनाम योजिले आहे, तसेच अकारि, पादि या रूपात एकटे इ हे सर्वनाम योजिले आहे. इ म्हणजे सामीप्यदर्शक हा. ही आत्मनेपदाची उदाहरणे झाली. परस्मैपदी लोट्च्या प्रथमपुरुषी एकवचनी पातु, यातु या रूपाप्रमाणेच पातात् यातात् अशी रूपे होतात. पातु व पातात् या दोन्ही रूपांचा अर्थ

पा + त् (तो) + उ (तो) = तो तो पाळो
पा + त् (तो) अ(आज्ञार्थक आगम) अत् (तो) = तो हा तो पाळो

असा एकच आहे. फक्त पातात् या रूपात आज्ञार्थक अ आगम जास्त आहे. कोणतेही सर्वनाम, साधे किंवा जोड धातूच्या पुढे येते याचे आणिक एक परस्मैपदी उदाहरण देतो. येतप्रमाणे ऐतत् असे लङ्च्या प्रथमपुरुषी एकवचनी रूप होई. अ+ इ (धातु) + त् = (अ) इत्; आणि अ + इ (धातु) + त् + अत् = (अ) इतत्. इत् म्हणजे तो (त्) गेला (इ) आणि इतत् म्हणजे तो (त्) हा तो (अत्) गेला (इ) पहिल्यात तो या अर्थीं फक्त तू हे एकच सर्वनाम योजिले आहे आणि दुसऱ्यात तो याअर्थीं तो हा तो अशी तीन सर्वनामे जोडून योजिली आहेत. अर्थात किंचित् फरक आहे.

त्, त, ति, ते, तै, तु, ताम्, अ , इ, अम्, ए या सर्वनामांप्रमाणे आणिक काही सर्वनामे प्रथमपुरुषी एकवचनी धातूंच्या पुढे लागतात. त्यांची व यांची मिळून सर्वांची याद
अशी: ह्न

लङ् ह्न अ+त्=अत् (हा, तो) भवत् (परोक्ष = भूत)
लेट् ह्न अ+अ+त्=आत् (हा, आज्ञार्थक अ, तो) भवात् (परोक्ष ह्न भूत)
लट् ह्न अ+ति= अति (हा, तो, प्रात्यक्षदर्शक इ) भवति (वर्तमान)