Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

परस्मै

लट् : अद् त् इ = अत्ति
लेट् : अद् अ त् इ = अदति, हनति
लङ् : हन् त् = हन् (त्)
लेट् : हन् अ त् = हनत, अदत्

आत्मने
लट् : कश् त् अ इ = कष्टे
लेट् : कश् अ त् अ इ = कशते
कश् अ त् अ अ इ = कशतै
लङ् : ईश त् अ = ईष्ट
लेट् : ईश् अ त् अ = ईशत

लेट् दोन प्रकारचा; पहिला परोक्ष लेट् व दुसरा प्रत्यक्ष ऊर्फ वर्तमान लेट्. कशते, कशतै व अदति, हनति, हा प्रत्यक्ष लेट्; कारण या लेट् मध्ये त् सर्वनामाला प्रत्यक्षत्वदर्शक इ सर्वनाम जोडलेले आहे. हनत्, अदत्, ईशत हा परोक्ष लेट्; कारण या लेट् मध्ये त् सर्वनामाला प्रत्यक्षत्वदर्शक इ सर्वनाम जोडलेले नाही.

प्रत्यक्ष व परोक्ष असा लेट् दोन प्रकारचा असतो, हे प्राचीन पाणिनीच्या किंवा अर्वाचीन युरोपियन वैय्याकरणांच्या लक्षात आलेले नाही. हनत्, अदत्, अदति, हनति, या परस्मैपदी लेट्च्या रूपात व कशते, कशतै, ईशत या आत्मनेपदी लेट्च्या रूपात भेद असा आहे की, लट् व लङ् यातल्याप्रमाणेच आत्मनेपदी रूपात खास स्वत्वदर्शक अ सर्वनाम जास्त आहे. तेव्हा लट्, लङ् व लोट् यातील आत्मनेपदी व परस्मैपदी रूपात अ च्या आधिक्याचा जो भेद तोच लेट् च्या आत्मनेपदी व परस्मैपदी रूपात आढळतो.