Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

लट् व लङ् या दोन लकारांच्या परस्मैपदी व आत्मनेपदी प्रथम पुरुषाच्या एकवचनाच्या साधनिकेत त्, अ व इ ही तीन सर्वनामे येतात. नुसता त् परोक्ष म्हणजे भूतकालीन परस्मायक क्रिया दाखवितो; अ कर्त्याचे खास स्वतस्त्व दाखवितो आणि इ क्रियेचे वर्तमानकालीनत्व ऊर्फ सन्निकृष्टत्व दाखविते.

आतां लोट् मध्ये काय प्रकार आहे ते पाहू. अत्तु हे अद् धातूचे परस्मायक रूप आहे व कष्टाम् हे कश् धातूचे आत्मनायक रूप आहे. अद् त् उ व कश् त् अ अम् अशी प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत वाक्ये होती. अद् त् उ या वाक्यात त् पारीक्ष्यदर्शक आहे व उ किंचित् विप्रकर्षदर्शक आहे. अद् त् उ म्हणजे तो (त्) तो (उ) खावो. कश् + त् + अ + अम् या वाक्याचा अम् म्हणजे हा, अ म्हणजे खास हा व त् म्हणजे तो, मिळून तो खास हा स्वत: जावो (कश्), असा अर्थ आहे. अत्त या रूपात त् व उ दोन्ही विप्रकर्षदर्शक आहेत, परंतु कष्टाम् या रूपात अम् सन्निकर्षदर्शक असून शिवाय अ हे खासपणा ऊर्फ स्वतस्त्व दाखविणारे सर्वनाम जास्त आहे. सबब अत्तु हे परस्मैपदी व कष्टाम् हे आत्मनेपदी रूप समजले जाते. लट् व लङ् प्रमाणेच लोट् मध्येही अ सर्वनाम आत्मनायकत्व दाखविते. आता वैदिक लेट् मधील प्रथम पुरुषाच्या एकवचनाचे पृथक्करण आधी करू