Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

५० भूर, भुवर्, स्वर् इत्यादी अव्यय नामांच्याहून चिरम्, अकस्मात्, अभीक्ष्णम् इत्यादी अव्यये स्वभावाने निराळी, सबब त्यांच्याविषयी येथे विचार करणे नको, या शब्दांना विभक्तिप्रत्यय होऊन, काही कारणास्तव अविकारित्व आले आहे इतकेच.

५१ आता येथपर्यत केलेल्या पृथक्करणाचा आढावा घेऊ व त्यापासून काय काय नवी
माहिती मिळाली ती कलमवार स्मरणार्थ टिपून ठेऊ :

१) आर्यपूर्वजांची भाषा प्रथमारंभी वचन, विभक्ती किंवा लिंग त्यांच्या प्रत्ययांखेरीज होती म्हणजे अप्रत्यय होती.
२) त्या अप्रत्यकाळी आर्यपूर्वज भाषेत सानुनासिक ह्न भाषा व निरनुनासिकभाषा असे दोन भेद झाले होते. सानुनासिकवाले सर्व स्वर नाकांतून उच्चारीत. निरनुनासिकवाले कोणताही स्वर अनुनासिक उच्चारीत नसत. हा अनुनासिक बहुतेक अनुस्वाराच्या किंवा न् च्या जवळ जवळ उच्चारात असे. कोकणात देवळात हे सप्तमीचे रूप देवळान्त असे नकारमय उच्चारतात, त्याप्रमाणे अनुनासिकांचा उच्चार कित्येक लोकात बहुतेक न् सारखा असे. आताचे लोक याचा उच्चार आतान्चे लोक असा नकारमय होतो किंवा आताँचे लोक असा ओझरता होतो किंवा आताचे लोक असा निरनुनासिक होतो. तोच प्रकार त्या प्राचीनतमकाळी आर्यपूर्वजांच्या भाषेत होत असे, सबब अनुनासिकाचा न होणे नित्यातले व परिचयातलेच होते.
३) त्याकाळी वैदिकपूर्वज कंठ्य उच्चार फार करीत. स चा उच्चार बहुतेक ह सारखा असे.
४) त्याकाळी त चा उच्चार बहुतेक स सारखा असे. उदाहरणार्थ चमस शब्द चमत् असाही उच्चारला जाई व चमस् असाही उच्चारला जाई.
५) त्याकाळी स चा उच्चार ऱ्ह सारखा होई व ऱ्ह चा उच्चार जवळजवळ ह सारखा असे. ह व उपसर्जनीय हे बहुतेक उच्चारात सारखे असत.