Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
कादंबरी
राजवाड्यानी समाजशास्त्राचे जे विविध पैलू हाताळले त्यात जाता जाता त्यांनी साहित्याला हात लावला आहे आणि त्यातही त्यांची बुद्धिमत्ता, विशाल दृष्टी व वाचन किती होते हे त्यांच्या " कादंबरी" या निबंधात दिसते...."समाजातील हा जो पतित भाग आहे त्याच्या स्थितीचे प्रदर्शन करणे हे प्रत्येक कादंबरीकाराने आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे....या देशातील दारिद्याने गांजलेल्या, रोगाने पीडिलेल्या व विद्येने मागासलेल्या सामान्य जनसमूहाचा कैवार सहृदयतेचे मूर्तिमंत पुतळे जे कादंबरीकार त्यांनी घेतला नाही तर दुसरा कोण घेईल ?" साहित्यावरचे राजवाड्यांचे हे विचार "कादंबरी '' या निबंधात पाहून मराठीत साहित्यावर होणा-या वादावर बराच प्रकाश पडतो. पाणिनी, व्याकरण, वेद, प्रपंच, इतिहाससाधने, स्मृतिलुप्त झालेले नगर शहराचे संशोधन, धातुकोश एक ना दोन अशा शेकडो विषयांच्या अभ्यासात "कादंबरी" वाचनही चालू असे. ते केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर "समाजशास्त्राचा" भाग म्हणून.
त्या वेळच्या अनेक नामांकित साहित्यिकांचे त्यांनी मूल्यमापन केले. त्यात इंग्रजी भाषांतरित इतर देशातीलही लेखकांच्या कादंब-यांचे त्यांचे वाचन खूपच व्याप्ती करून केलेले होते. ह्युगो आणि टॉलस्टॉयची महती दाखविताना त्यांनी हरि नारायण आपटे यांना अलिकडच्या साहित्यसमीक्षकाप्रमाणे त्यांनी कच-यात टाकले नाही. हरिभाऊंची "काळ कठिण आला ” ही गोष्ट लिहून इंग्रजांचा राग ओढवून घेतला हेही इतिहासकार विसरले आहेत. माझ्या मनात एकच गोष्ट खटकली ती ही की त्यांनी फ्रेंच कादंबरीकार डुमासला एवढा मोठा दर्जा देण्याचे काय कारण ? आणि दुसरे असे खटकले की इंग्रज कादंबरीकार रेनॉल्डस् याबद्दल लिहिताना "इंग्रजी कादंबरीकारांतील अत्यंत रद्दड असा जो रेनॉल्डस् यांच्या भिकार कादंब-यांचेच आस्वाद घेणारे हरीचे लाल आपल्या इकडे पुष्कळ" हे विधान त्यांनी कां करावे ? त्याच्या अनेक कादंबच्या "रद्दड " समजायला म्हणजे नुसत्याच ऐतिहासिक गोष्टीवरचा रोमान्स आहे हे खरे. डुमासचाही तोच प्रकार आहे आणि हरि नारायण आपटे यांची 'रूपनगरची राजकन्या' किंवा 'वज्राघात' याच सदरात पडतील. रेनॉल्ड्सबद्दलचा हा समजच या अनेकांत पाहिला आहे. एवढेच काय तर इंग्रजी वाङ्मयाचा इतिहास लिहिणा-यांनी या ग्रंथकाराचा उल्लेखही केला नाही.