Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 

[२०४]                                        ।। श्री ।।              १९ जून १७६०.

राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः

विनंति उपरि. सुज्याअतदौलाचा मजकूर दोन तीन पुरवणियांत लिहिला. त्यांत मुख्य मजकूर हाच कीं नजीबखानाचे जाणियामुळें अबदालीकडे जाणार. परंतु अद्यापि उलग आहे ह्मणोन. तरी खासास्वारी जवळ अगरियास यावी ह्यणजे आपण त्यास मिळत नाहीं असें लिहीत असतां, त्यांणीं, आह्मी जवळ आलों असें असतां, हा विचार मनांत आणिला हे गोष्ट त्याचे दूरंदेशीस व चालत आल्या स्नेहास अयोग्य व त्यास ही गैर नफियाची गोष्ट आहे. कशी ? तर हाफीजरहिमत याचे मारफातीनें सरदारांशीं राजकारण अबदालीचें लागलें आहे. बोलोनहि हाफीज गेला आहे. हें ठीक जाहले तरी जाईल व ज्यांणीं ज्यांणीं लबाडी केली त्याचें पारपत्य हातून होईल. कदाचित् राहिला तर आह्मी, सरदार व जाट येका दो दिवशीं अगरियाजवळच एक होऊन पार उतरून उत्तम प्रकारें पारपत्य करितों. सर्वहि गोष्टी उत्तम होतील. आमचा इतका जमाव पडला असतां त्यांत सुज्याअतदौला जाऊन फसतील. एक तर आमचा पुरता दावा पडेल. आणि अबदालीस पैका न मिळाला नजीबखानानें कबूल केला आहे त्यास पैक्याचें कूळ हेच आहेत. यास त्याजपासोन उलगावावें ह्मणजे सहजच पैका देणें आला. हेहि गोष्ट त्यास वाईट. याचाहि विचार दूरंदेशीनें केला असेलच. यांतून जाणार नाहींत. तथापि त्यास कोण्ही बहकावितात. तर हें त्यास हें उमजवावें. सर्वथा त्यांणीं न जावें. नजीबखानास साफच जाब द्यावा; लावून द्यावा. त्यांणीं पार राहावें. इकडे यावयाचें करावें, याचा भरंवसा फार होता. माधवसिंग याचा विश्वास होता. त्यास त्यांणी फौज तयार केली. आपण येणार. कमाविसदार वकील सोडिले. इतकें त्यांणीं केलें. याचा भरंवसा असोन हे गोष्ट सहसा याणीं करूं नये. अबदाली उपरी. किती दिवस पुरवेल. आह्मी नेहमीं आहों. श्री कृपेने हरएक गोष्ट सत्वर होऊन येईल. आता त्याणीं उलग नसावें हें उचित असे. जाणिजे. + सरदार आह्मी एक होऊन सत्वर जें करणें तें करूं. याउपरि त्याचा जाबसाल तोडून एकपक्षी पुरतें व्हावें. आतां तिकडे जातील, तर नेहमीं आह्मांकडे तोडून जाणें तरी जावें. सर्व अर्थ गरम नरम होऊन त्याचें जाणें तिकडे न होय तें करणें. वर्तमान वरचेवर लिहीत जाणें र॥ छ ५ जिलकाद. बहुत काय लिहिणें. हे विनंति.