Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१९१] ।। श्री ।। २८ मे १७६०.
राराजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मीं पत्र ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेचें पाठविलें तें छ १० सवालीं प्रविष्ट जाहलें. त्यांत अबदालीची लष्कराची बातमी तपशीलवार लेहून पाठविली व कितेक मजकूर लिहिला तो सर्व कळला. त्यास, याच प्रकारें बारीक मोठें वर्तमान लिहिणें. प्रस्तुत वर्तमान आहे कीं माघारा जाणार२७५ अफीज रहिमतखान मथुरेस जाटासी बोलावयास आला आहे. गंगोबासहित जाटहि गेला आहे. काय होईल तें लेहूं. जाहानखान व नजीबखान ईटावेकडे गेले ह्मणोन खबर आहे. त्याचेंहि वर्तमान लिहिणें. सुजाअतदौला याचा प्रकार तपशीलवार लिहिला कीं वजिरी द्यावी व अलीगोहर पातशा करावा, याविशीं निश्चयपूर्वक लिहिलें यावें ह्मणजे याचा गुंता नाहीं, होऊन येतो, ह्मणोन. तर याचा जाबसाल तुह्मी पहिला तुह्मी बोलता होता त्यास वाकीफ आहां. दुसरे कोण्ही मातबर यासरिखा असल्याखेरीज बंदोबस्त व्हावयाचा नाहीं. व शाहाजादाहि आणावा येविसी वारंवार लिहिलीं गेलींच आहेत. दुसरा विचार सुजाअतदौलानें न करितां यावें हेंच उत्तम आहे. तुह्मीं याप्रें।। करणें. कदाचित् आमचा पका दस्तावेज गोऊन मग यावें हा प्रकार मनांत आणून जाबसालावरी घालतील तर न घालावा. आह्मी लौकरीच सरदारांजवळ जाऊं. भेटी होतील. त्यांणीं जाबसाल काय कसा केला तो पुर्ता समजोन तुह्मांसहि लेहून लौकरीच पाठवितो. परंतु त्यांणी लवकर यावें, शत्रूचा पराजय करावयास सामील व्हावें, हेंच उचित आहे. + त्याचे वजिरीचा मजकूर पहिलाच आहे. तुह्मीच बोलत होतां. आतांहि मातबरावांचून बंदोबस्त होणार नाहीं. त्यांणी घरचें काम जाणून सत्वर यावें. मोठें काम जालिया त्याचे हातें इछित काम होईल. याचा निश्चय, पांच सात रोजांत सरदार जवळ होतील, मग लेहून पाठऊं. लक्ष्मीनारायणाचे हातें सरदरांनीं निशा पाठविलीच असेल. र।। १२ सवाल. बारीक जलद बातमी दररोज येई असें करणें. नजीबखान काय तजबीजेंत? पैकियाचे तगाद्यामुळें पाय काढला अशी खबर आहे. ठीक आणून लिहिणें. ठाणीं खबरदार राखणें. हे विनंति.