Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ १२६ ] ।। श्री ।। १४ फेब्रुवारी १७५९.
पे॥ छ १५ ज।।खर, तिसा, माघ वद्य द्वितीया.
सेवेसी विज्ञापना येथील वर्तमान त॥ छ १३ माहे जमादिलाखरपर्यंत यथास्थित असे. विशेष. सरकारचे खिजमतगार राजश्री स्वामीकडे चौकीस आहेत. त्यांस सरकारांतून सालमजकूरचे दसरियाचें कापड देविलें आहे. त्याची चिठ्ठी फडणिसाकडील जाहाली. खिजमतगारांनीं चिठ्ठीप्रें।। कापड घ्यावें तें न घेतां श्रीमंत महाराज मातोश्री *आईसाहेब यांजबरोबर तातडीनें निघोन आले. कापड घेतलें नाहीं त्यास, हालीं सदर्हू खिजमतगारांपैकीं मनाजी जाधव व कुसाजी ढमढेरा दोन असामी कापडाची चिठ्ठी घेऊन स्वामीकडे आले आहेत. तरी जामदारखान्यांत सदर्हू चिठ्ठीप्रें॥ कापड द्यावयाची परवानगी देऊन यांची सत्वर रवानगी करावी. येथें चौकी नाजूक आहे यास्तव खिजमतगार सस्वर माघारे पाठवावे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.