Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[ १२५ ]                                    ।। श्रीराम ।।           ४ मे १७५८.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामीचे सेवेसी:

सेवक गोविंद भिकाजी कृतानेकशिरसाष्टांगनमस्कार. विनंति. उपरि येथील वर्तमान चैत्र वद्य १२ जाणून स्वामींनीं आपलें निजानंदवैभव दरघडी लिहीत जाणें. तेणेंकरून सेवकास आनंद होय. विशेष. येथील वर्तमान तर, नवाब जाफरअलीखान१७९ पटण्ये प्रांतीचा बंदोबस्त करायानिमित्य आले आहेत. आह्मीहि समागमें आहों. पटण्येचा बंदोबस्त तर राजा रामनारायण मात्र येऊन भेटला. आणखी जमीदार कोणी भेटले नाहींत. गयेचा सुंदरशा राजे येऊन भेटला. उभयताची मामलत, पटणची सुभेदारी, नवाब जाफरअलीखानानें आपले लेकाचे नांवें केली. त्याची नायब राजसुभेदारीची वस्त्रें राजे रामनारायणास दिलीं. इकडील बंदोबस्त करून नवाब जाफरअलीखान ता॥ छ १६ साबान कुच करून बंगाल्यास मजल दरमजल जात आहेत. पुढ़ें जें कांही वर्तमान होईल तें सदैव लिहिलें जाईल. विशेष. सेवकानें श्रीमंत राजेश्री दादासाहेबांस विनंतिपत्र पाठविलें, कांही खर्चाविसी. त्यास, सेवकावर कृपावंत होऊन रुपये ५०० पांचशेंची वरात स्वामींचे नांवाची पाठविली आहे. आणि सेवकाचे पत्रांत लिहिलें आहे की तुह्मीं वरात रुपये ५०० पांचशांची आपले मनुष्यासमागमें पाठवून देणें. ते तुह्मास पांचशे रुपयांची हुंडी करून ऐवज पावता करतील. त्यास, स्वामीजवळ रेसन कासीद समागमें वरात पाठविले आहे. त्यास, स्वामींनी कृपा करून पांचशे रुपयांची हुंडी करून मकसुदाबादेस ऐवज पावता होय तें करणे. हुंडी मकसुदाबादेच्या कासीदासमागमें पाठवून देणें. परंतु कासीदास लवकर बिदा करणें. जरूर. बहुत दिवस न ठेवणें, आह्मांवर खर्चाची बहुत तंगचाई आहे, ते पत्रीं लिहितां पुरवत नाहीं. याजकरितां सेवेसी विनंतिपत्र पाठविलें आहे. स्वामींनीं सेवकावर कृपा करून लवकर कासिदासमागमें हुंडी करून रेसन कासीदास लवकर रवाना करून देणें. त्यापैकीं रुपये ५ पांच रेसन कासीद यांस खर्चास देणें. बाकीची हुंडी करून पाठवणे. त्या प्रांतीचें वर्तमान नवल विशेष कांहीं आलें असेल तर लेहून पाठवून देणे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. हे विनंति.