Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ १२२ ] ।। श्री ।। २२ फेब्रुवारी १७५८.
राजश्री रामाजी महादेव यांसि:-
राजश्रियाविराजितराजमान्यराजेश्री बाळाजी गोविंद स्वामी यासीः –
पे।। बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. राजश्री माधवराव नारायण व चिंतामणराव नारायण पाटणकर यांस चिरंजीव राजश्री दादासाहेबांकडे रवाना केले आहेत. त्यास चिरंजीवाची स्वारी लांब गेली; आणि वाट१७६१७६ न चाले; निभाव न होय तरी तुह्यांजवळ रहातील. यास रोजमुरा.
दीडमाही रुपये | आठवडा रुपये | |||
५० | माधवराव नारायण | २ | माधवराव नारायण | १ |
६० | चितांमणराव नारायण | ४।। | चितांमणराव नारायण | २ |
११० | ६।। | ३ |
एकूण एकशें दहा रुपये दीडमाही व साडेसहा रुपये तीन राऊतास आठवडा पावत आहे. याप्रमाणें रोजमुरा सदर्हू प्रे॥ देत जाणें. जाणीजे. छ १३ जमादिलाखर, सु।। समान खमसैन मय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणें. हे विनति.