Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[ १०१ ] ।। श्री ।। १ आक्टोबर १७५७.
अवधूतराव केशव.
अर्ज. विज्ञापना ऐसीजे. हिंदुस्थानाकडील वर्तमान आलें कीं गाजुद्दीखान वजिरांहीं श्रीमंत राजश्री दादासाहेबासी सलूक करून उभयतां एकचित्त होऊन नजीबखान रोहिला जेर केला. तेव्हां येऊन भेटला असे. वजिरांहीं बंगल्यांतील पैका आणिला होता. पातशहाचे खजान्यांत एक करोड बत्तीस लाख रुपये दाखल केले. पुढें आतां मोहीम लाहोरावर श्रीमंत व वजीर करीत आहेत. पंधरा हजार स्वार अंताजी माणकेश्वर याजबरोबर देऊन तमाम ठाणीं पठाणांची उठवून आपलीं बसवीत आहेत. दिल्लीहून कूच करून अकबरपूर पावेतों गेले आहेत. दोन पातशहाजादे१६९ समागमें घेतले आहेत. लाहोरीहून पठाणहि बाहेर निघाला आहे. दिल्लीकडे येतो वार्ता असे. लाहोरचा सुभा श्रीमंतास दिधला असे. वरकड मुलकांतील पैसा निमेनिम वाटून घ्यावा. पातशहास दरमहा बांधला आहे तो निमेनिम देत जावा. इतक्यावर जे वर्तमान होईल ते विनंति लिहून.१७० येथील दरबारचे वर्तमान छ १६ रोजी नवाबास कन्या जाहाली. ह्मणोन प्रात:कालीं बिसालतजंग व तमाम अमिरांनी नजरा केल्या. राजश्री जानोजी निंबाळकराहि आले होते. तेथून बिसालतजंगाचे डे-यांत जानोजी महाराऊ आले. च्यार घटका बसले होते. दोन प्रहरा निजामुदौला ताशाचा१७१ पोशाक करून मुबारकबादीस१७२ आले. नजर केली. दोन घटका बसून मग बिसालतजंगाचे डे-यास आले. तेथें एक प्रहर बसून खिलवत केली. मग तीन रकम जवाहीर व नव पारचे१७३ नजर केले. नवाबांनीं आपली स्वारी बागांत जायासी तयार करविली होती. तेथून परस्परें निजामदौलाचे डे-यास जाणार होते. हा काळवर तिघे बंधू समाधानेंकरून आहेत. नवाबास निजामदौला ह्मणों लागले कीं तुह्मीं आह्मांस $आसफजाचे ठायीं आहांत. लोकांनीं नाहक तुमचे मनांत वसवास घातला असे. मनांत कृत्रिम असेल तर कुराणावर हात ठेविला. तेव्हां नवाबांहीं उत्तर केलें कीं दौलत सलतनत अवघी तुमची आहे. ऐशीं परस्परें स्नेहाचीं भाषणें करून येवेळेपावेतों समाधाने आहेत. उदईक जें वर्तमान होईल तें लिहून. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
पे॥ छ १७ मोहरम, रविवार, अडीच प्रहर दिवस चढता.