Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
इतक्या सरदार मातबर राजे लोक देखील, आपल्या सैन्यासमवेत आपल्यासी मिळाले आहेत । करितां निजामशाहा पादशाहा अल्लीयदल्शाहास तृणप्राय मानीत होते ।अल्लीयदल्शाहानी यादव राजाचे सैन्यासहीत झाल्या कुमके वरून हीं व दिल्लेश्वरानी मोगलाची कुमकें पाठविल्या कडूनहीं निजामशाहासी युत्धास प्रवर्तले। करितां त्या कडील सरदाराची नावनिशाः-प्रथम यादव राया कडील सरदार राजे लोक वगैरे ह्मराटे, तुरुक देखील नावनिशाः–जलाखान्; वजीरखान्, व खरमुल्लाखान्; व सुजान्खान्; व जहिन्खान्; व शिकंदरखान्; व खलेलखान्; व हिसामदखान्; सदरल्हा तुरुक आठ जण । यादव राजाचे लेंकाच्या नावनिशाः–उदाराम; व विश्वनाथ; व अचल; व बाहदर; व दादाजी; व राघव; व जसवंत; हे सात हीं यादव राजाचे लेंक । हे यादवराजाकडील सरदार समवेत यादवराजाहीं; दिलेश्वरानी पाठविल्या मोगलाचा सरदार लष्करखान् अल्लीयदलशाहा कडील सरदार म-हाटे तुरुक वगैरे देखील, मुस्तफाखान; महमदखान्; दिलावरखान्; याकूतखान्; अंबरखान्; मुसेखान्; फरीदखान्; सजीखान्; जोहरखान्; अंकूशखान; येकून १० । या खेरीज अल्लीयदलशाहाचे वडील इभराईम याचे अराइब सरदार, रुस्तुंखान् प्रभृति, आणि धुंडिराव ब्राम्हण सरदार; ह्मराटे सरदार घाटगे प्रभृति; । सेनापती मुल्लामहमदखानास पुढें करून निजामशाहासी युद्धास प्रवर्तले । वरि लिहिलेप्रमाणें निजामशाहानी आपले तर्फेचे सैन्य व सरदार राजे लोक इत्यादिकाशीसह, अंबरखान सेनापतीस पुढें करून अल्लीयदलशाहासीं युत्ध केलें । त्या युत्धांत मालोजी राजाचे लेंक शाहजी राजानी रणशूर होऊन पूर्वी देवासुर युत्धापरी युत्ध करून दिल्लेश्वर जाहगीर पादशाहानी अल्लीयदलशाहास कुमकस पाठविल्या मोगलांच्या सैन्यास तमामास पराजय देऊन पळविले । त्या बरोबरी मिळून युत्ध केले ते यादवराजाची फौजेसहीं पराजय देऊन पळविलें ।