Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ३६ ] श्री. ३० जुलै १६७७.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ४ पिंगल नाम संवत्सरे श्रावण शुद्ध एकादशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपती याणीं केदारजी जाधव बिन फिरगोजी हवालदार इमारत कोट उटळूर यासी आज्ञा केली ऐसी जे - स्वामी कृपाळू होऊन इमारत मजकुरीचा तुज हवाला देऊन सरंजामी करून व मजमूदार देऊन ठेविलें तैनात ता।।
खासा तैनात सालीना होन १२५ यासी चाकर रा । प्रा । चालवणें व हुजूर पोतापैकीं वा । नून पा ।। होन कावेरीपाकी १० |
लक्ष्माजी मादरस मजमूदार, इमारत मजकूर, तैनात सालीना होन ३६ यासी वा । हुजूर पोतापैकी होन कावेरी पाक होन ३ |
एकूण असामी २ यासी तैनात होन सालीना एकशे एकसष्टी रास केले असेत इमारत काम चालते होईल ते दिवसापासून घेत जाणे, व सदर्हू होन तंरा बाकी वजा करणे व तैनातेस वजा वाटा, उचितीप्रमाणे वजा करून बाकी बेरीज घेत जाणें मजुरा असे लेखनसीमा.
मर्यादेयं
विराजते.
सुरू सूद बार.
श्री
शिवचरणीं तत्पर
त्र्यंबक सुत मोरेश्वर.