Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

[ १७० ]                                      श्री.                                            जानेवारी १७४५.                                                                                                                                                    

समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री सरकारकुनानी व समस्त सैना हिंदुपत सरदारानी यासी आज्ञा केली ऐसी जेः -

काळपरत्वें आमचा प्रसग विस्कळित होऊन चिरजीव राजश्री सभाजी राजे व राजसबाई याणीं गिरजोजी यादव व अंताजी त्रिमळ व लोकखासकेल गडकरी व तुळाजी सितोळे यासी पुढें करून किल्ले पनाळा येथे चिरंजीव राजश्री सभाजी राजे यांसि राज्यपदास बैसविले, आह्मास संकटी घातले, बहुत निकड केली ते प्रसगी चिरजीव राजश्री शिवाजी राजे यासि सतान सौभाग्यवती पार्वतीबाई यासि दोघे पुत्र झाले त्यापैकी पहिला पुत्र क्रमला दुसरा पुत्र त्यासी देवी सगर्भ होती. प्रसूत जाली त्याचा फेरमोबदला करून हा मूल देवीच्या स्वाधीन केला पाळग्रहण करविलें सौभाग्यवती भवानीबाई सगर्भ होती. त्यानंतर चिरंजिवास देवी येऊन काळवशें समाप्त झाले. समागमें सौभाग्यवती पार्वतीबाईंनीं सहगमन केलें. त्यांचा पुत्र देवीच्या स्वाधीन केला. तो अद्यापवर तिजपाशीं सुखरूप आहे. सौभाग्यवती भवानीबाई पोटीसी होती. ती प्रसूत झाली. पुत्र जाहला तो चिरंजीव राजश्री संभाजी राजे व राजसबाई यानीं कपटबुद्धि करून मारिला. काय निमित्य ह्मणून पुसिलें त्यास त्याणीं उत्तर दिलें जे- " राजश्री शाहूराजे यांची आज्ञा आपणास आहे, त्यावरून आपण अपाय केला," ऐसें जनांत सांगो लागले कांहीं दिवस तैसेच गेले त्याउपरि उभयतां चिरंजीवांचा विवेक होऊन भेटी जाल्या एक दोन वेळा सप्तऋषीस चिरजीव करवीरवासी यांचें आगमन जालें. उभयपक्षीं सौरष झाला. त्यानंतर चिरंजीव राजश्री शाहूराजे याणीं यासि आग्रह केला जे - समस्तांच्या भेटी घ्याव्या असा हेतू आहे त्यावरून सर्वांस आह्मांस बरोबर घेऊन गेले ते समयी आपले वस्तु इकडील दु ख न साहवे. यास्तव चिरंजीव राजश्री शाहूराजे याजपाशी आपणास रहावें लागलें देवी व मूल समागमेंच होतीं. परंतु ते समयीं याणी त्यासी पळवून समागमें घेऊन आले. त्यानंतर चिरंजीव राजश्री शाहूराजे याणीं आपणास दोन चार वेळा पृच्छा केली जे - पुढां वंशाचा विचार कैसा आहे. परंतु आपण अंत न देतां उडवाउडवी केली त्यावरी राजश्री शाहूराजे दत्त पुत्र गोत्रजांचा घेत होते, तेव्हांहि मागुती आपणास पुशिलें. त्यावर आह्मीं उत्तर दिले जे - गोत्रजांचा पुत्र तुह्मीं घ्यावासा काय आहे श्री महादेव तुह्मांस पत्र देईल, एव्हाच त्वरा करावीशी नाहीं. त्याउपरि ते गोष्ट तैशीच राहिली. चिरंजीवाचा मनोदय नि:संशय आपणास कळला नाहीं ऐसें पाहोन स्त्रीलोभे, धनलोभे, राज्यलोभें विसर पडोन कालहरण केलें. समयपरत्वें उद्भव होणे ते समयीं होईल, हा भाव चित्तीं आणून हा काळपर्यंत गुप्तच राहिलों पुढें वृद्धापकाळ, देशकालवर्तमान नकळे, मुलास सतरा अठरा वर्षे होत आली, मागें पुढें कोणी खरें लटकें ह्मणतील, याजकरितां कैलासवासी राजश्री रामचद्रपत याणीं आमच्या राज्यात वडिल वडिलां तागायत निष्ठेने सेवा केली, मोडिले राज्य त्याणीं संभाळून यश कीर्ति संपादिली त्यांचे पुत्र राजश्री बाजीराव बरा शहाणा आहे, आपणाजवळ निष्ठेने वर्तत आहेत, ऐसे पाहोन वाडियातील मूल राणोजी माने व शिवाजी खाडेकर याजबरोबर पत्रे व वस्त्रें देऊन राव मशारनिले याजकडेस पाठविले आणि येविशीची आज्ञा करणें ते केली आहे मुलास युक्तिप्रयुक्तीनें हे आपणाजवळी आणवून, तुह्मास लिहून व सांगून पाठवितील, त्याप्रमाणें सर्वत्र गोष्टीस साह्य होऊन कार्य करणे. यासी एकंदर हैगै न करणें. राजबीज खरें हें राजश्री उपाध्यांस व आपा प्रतिनिधी व चिंतो महादेव आदिकरून सर्वास दखल आहे. याचा शोध पुर्ता व्हावा यास्तव राव मशारनिले उमरजेस चिरंजीवाच्या व आमच्या दर्शनास आले. ते समयी आपण राव मशारनिले यासि निश्चयपूर्वक आज्ञा करणें ते केली. त्याउपर चिरंजीव राजश्री शाहुराजे याणीं या गोष्टीची पृच्छा रायांस वेघळे वाटेनें केली. रायांनी इकडील आधारें उत्तर प्रतिउत्तर करणें तें केलेंच. चिरंजीवांनी रायासी आज्ञा केली जे - तुह्मीं याचा शोध जे युक्तीनें होईल ते प्रयुक्तीनें करणें. ऐसियासी तुह्मीं सर्वांही राजश्री राव मशारनिले यांचें सर्वविशीं सारथ्य करून मुलास ठिकाणीं आणवणें. मग जे आज्ञा करणें ते केली जाईल. लग्न मुहूर्ताचा प्रसंग होणें आहे. त्यास राजश्री संताजी मोहिते व नागोजी घाटगे यांच्या समतें पुढें करणें. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.