Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५१ ] श्री. १७३६.
राजश्री भगवंतराव पंडित अमात्य हुकुमतपन्हा गोसावी यांसीः -
सकलगुणांलकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजामन्य स्ने।। सभाजी आगरे सरखेल सरसुभेदार आरमार रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आपण बावाजी करवडा व विठोजी पाटणकर यांजसमागमें मुखवचनी कितेक एकात्म (ते) च्या व पुढे मनसबा कर्तव्य पदार्थ सांगोन पाठविला. त्याप्रमाणें हरदूजणानी अक्षरशाहा आह्मापाशी निवेदन केलें ऐशास, आपला आमचा स्नेह अकृत्रिम होऊन आला व भेटीही जाहल्या तेसमयीं कितेक इष्टापूर्तीची भाषणें जाहली फेरो न ये राजकार्यप्रयोगप्रसंगीं सामील व्हावें साभिमान अनकूलता करावी ऐशी कितेक पदार्थे भाषणे जाहली त्याच अन्वयें हालीं आपण सागोन पाठविले. तरी याहून विशेष काय आहे ? आपला व आमचा एक हात निश्चयेकरून जाहाला तरी वरकड पदार्थे शत्रूचा पराभव व्हावया अगाध काय आहे ? परंतु एकात्मता पूर्ती चित्तापासून असावी. कां ह्मणजेल ? तरी, राजश्री बाजीराव पंडित प्रधान याणी बेलभाकर पाठविली व आह्मीही त्यांस पाठविली तथाप तो अर्थ एकीकडेस ठेवून, मुडा बसवून, इमानास खता केली. व इमानरोटी देवून मुडकरी यांणीं बेइमान केली. ऐसा विचार तुमचा आमचा नसावा. जो स्नेह कार्य मनसबा बंधुत्व संपादणें तें कार्य खामखा करावेंच करावें. बंधुत्व तो कितेकांनीं विपर्यास लहान मनुष्यानें अथवा थोराने घातलें तरी परस्पर चित्तारूढ करू नये सहोदर बंधुपमाची पदार्थ चालोन एकाने सामील व्हावें. साहित्य करावें. ऐसें आपल्या चित्तापासून असेललेयास फिगेन तफावत न पाडावी ऐसे पूर्ते आपलें मन शोधून पाहावें आणि आह्मीं माणसें पाठविलीं आहेत. यासमागमें आपल्या जिवाळ्याचा माणूस बरा शहाणा असेल तो पाठवून द्यावी. ह्मणजे, आह्मीही आपलेकडील भला माणूस श्रीकानोबाचा बेल भाकर पाठवून देवून आणि आपला आमचा एक हात करून आपले व आमचे योजिले मनसबे सिद्धीस न्यावे. याउपरि दुसरा विचार आमचे चित्तीं नाहीं. एवढें लिहिण्यास कारण कां ह्मणिजेल ? तरी पूर्वी एका दोहींकडून बेलभाकरीचा अन्वय, जाहला तो प्रसिद्ध आपणास कळलाच आहे. रघुनाथ प्रभू याणेंही दोन वेळां बेल काढून दिला. आणि बेइमानी करून खादल्या अन्नाचा निस्तरा देतो आहे याचाही परिणाम श्रीकृपेनें होईल, तो आपल्यास कळोन येईल. आपला आमचा स्नेह आजीकालीचा नाहीं. पूर्वी कैलासवासी तीर्थरूप याचा व आपल्या तीर्थरूपाचा स्नेह कोणे रीतीनें चालिला, व त्याणीं कोणे कोणे प्रसंगीं साहित्य केलें, एक एकास ते न चुकले त्यांचे पुत्र तुह्मीं आह्मीं एकात्मतेनें वर्तावें, शत्रूस पादाक्रात करावे, घरोब्यानें चालोन दुस-याचा हात शिरों देऊं नये, उचित असे सर्व अर्थ आह्मीं आपले चित्तापासून लिहून पाठविले आहेत. सविस्तर चित्तारूढ करून आपणही याच अन्वयें आपल्या चित्ताची प्रशंसता करून फिरोन यास अंतर न पडे एैसें करून, सदर्हू लिहिल्याप्रमाणें भला माणूस बेलभाकर पाठवून द्यावीं तदनुरूप येथूनही पाठवून देवून यास अतंर सहसा होणार नाहीं याउपरि आपल्या थोरपणास योग्य असेल तें करावें रा। छ ३ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें लोभ असो द्यावा. हे विनंति
लेखनसीमा.
˜ °
श्री शाहूनृप-
हर्षेण कानोजीत-
नुजन्मन. आंगरे -
सरखेलस्य शंभोर्मुद्रा
विराजते ll