Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

  [ ४६ ]                                       श्री.                                                      ८ जानेवारी १६९४.

अखंडितलक्ष्मीअलंकृत राज्यमान्य राजश्री रामचंद्र नीलकंठ देशकुळकर्णी ता। अजिरें गोसावी यांसीः-

1 सेवक त्रिंबकजी कानोजी सरदेसाई व कानोजीराऊ सरमोकदम देसाई व रवळोजी कानोजी देसाई व येळोजी तातोजी देसाई व रामजी विठोजी देसाई ता। अजिरें दंडवत विनंति सु।। अर्बा तिसैन अलफ. ता। मजकूर येथील देशकुळकरण देहें ९७ हे पूर्वी सिद्धाचे होतें. त्याची सेवा विठ शेणवी याचे वडिलांनी बहुता प्रकारें केली यावरून सिद्धांनीं कृपाळू होऊन यांचे वडिलासीं देशकुळकरण मिरास दिल्हेवरी त्याचे वडील देशकुळकरण ता। मजकुरींचे पुरातन वतनदार होऊन पीढ दर पीढ मिरासभोग करित आले पूर्वी याचे वडिलांचे वेळीं आपणास तगादा लागलें पाहून, मळ शेणवी याचे वडील सुखवस्ती आगंतुक होता यापासून कर्जपैकीं घेऊन कर्ज फिटेपावेतो देशकुळकरण मिरासपैकी तिसरे तकसीम गहाण ठेविले पैका पावलेवरी सदरहू तकसीम सोडून देणे त्यांसी तेहि बहुत दिवस तिसरा वाटा खात आले गहाण ठेविलेपैकीं एकासी तीन चार हिस्से पावून गेले त्यास वतनाशी सबध नाही मळशेणवीचे वडील तिसरे वाटा खातां, मिराशीमधे व्याप करून, वृत्तिसबंधे साजीस करून, महजर सनदपत्र काही करविलें असतां, स्वगोत्री ऐसेहि इलाखा लावूं लागले ऐशियांस, मळ शेणवी काही विठ शेणवीचे अउलियादिमधील नव्हे त्याणें जें काय आपले स्वार्थामुळें महजर सनदपत्र केले असेल ते कुली बातील आहेती. विठ शेणवीचे वडील वृत्तिभोग करित आले. त्याचे पीढनपीढ विठ शेणवीपावेतो चालिले विठ शेणव्यास मिराशीमुळें दगा करून जिवे मारिले मृत्यु पावला विठ शेणवीचे पीढनपीढ संतति फार वाढली नाही एकाचें पोटीं एक ऐसेची होत आले त्यावरी हा मृत्यु पावला याचे पोटी लेकरू जाहले नाहीं निपुत्रिक जाहला पुढे मिराशीस खावंद कोणी नाहीसे जाले. निपुत्रिकाचे मिरास ते दिवाणाचे त्यावरी महाराज साहेबासी हें वर्तमान विदित जाहालेवरी साहेबीं मेहेरबान होऊन तुह्मांस ता। मजकुरींचे देशकुळकरण शेरणी माथा ठेऊन अजराम-हामत करून दिल्हें असे देशकुळकरण ता। मजकूर देहे ९७ सत्त्याण्णव लेकराचे लेंकरी वशपरपरा भोग करून सुखरुप असणे विठ शेणवियाचे कोण्ही गोत्रज अगर वंशज कोण्ही नाही, हें सत्य असें देशकुळकरणाचे हक्क लाजिमा, पानमान, इनामती व इसाफती व बाजेकानूनाती देशकुळकरणाचें असेल ते आपले चालवून घेणे. हे गोष्टीस आह्मापासून अन्तर पडणार नाही आपले वृत्ति बराबरी चालविण्यास अतर होईल तरी यास आपले वडिलांचे इमान असे छ २१ जमादिलोवल.                                                                                                                   

 लेष-
       न आल-
      कार ll.