Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
आपल्या वतनाचा करीना सांगितला त्यावरून स्वामीने आपणास हुजूर बोलाविले, वर्तमान साकल्य विचारिले. त्यास, आपण बुनादीपासून आपले वतनाचें वर्तमान व कागदपत्र तमाम दाखविले. त्यावरून राजश्री पती व सभानाईकीं मनास आणून हा वतनदार खरा, परतु बेतकवी, यासी हर कोणाचा आधार जाहालियावेगळा हा सावरेना, ऐसें सभानाईक बोलिले त्यास आपण बोलिलों जे, आपले पदरी एका दिवसाचें खावयास नाहीं, उगेच मरावें याकरिता वडिलाचे कागदपत्र आपणापासी आहेती ते घेऊन, दरबारास जाऊन, कोण्ही त-ही वतनास वा आपणास धणी जाहाला तरी वाचोन. नाहीं तरी आपले प्रालब्धी असेल तें होईल. ऐसें आपले बोलणे सभानाइकीं ऐकिलें. मग सभानाईक बोलिले जे- वतनदार खरा, कोणे गोष्टीस खता नाही मग सभानाईक व कासीराम कुलकर्णी, मौजे काभेरी , यानीं विचार करून राजश्री रामचद्र नीळकठ यांसी बोलिले जे, स्वामीने या गोष्टीस मन घालून निमे देसकुळकरण व गावकुळकरण व ज्योतिष ऐसे द्यावे ऐसा तह जाहाला गावकुळकर्ण देहाय १८ पैकी वजाः-
रामाजी अनंत व नरहरी अनंत व गोपाळ अनंत ठकार वशिष्ठ गोत्री यासी गावकुळकर्ण व ज्योतिष, मौजे दरुण, पा। मजकूर.
कासीराम अंगापूरकर खुर्द कुळकर्णी, मौजे काभेरी, किल्ले परळी, यासी गांवकुळकर्ण व ज्योतिष, मौजे विसापूर, पा। मजकूर.
बारी गावकुळकर्णे व ज्योतिषें खेरीज जोतीस मौजा कुरोळी देहाय १६ बितपशील-
१ | मौजे नेर | १ | मौजे नायगाव | १ | मौजे अंभेरी |
१ | मौजे कोकराळ | १ | मौजे रामेश्वर | १ | मौजे दरजाय |
१ | मौजे पळसगाऊ | १ | मौजे येलनारवाडी | १ | मौजे उबरमळई |
१ | मौजे दव्हवडी | १ | मौजे बनपुरी | १ | मौजे कुरोळी खेरीज |
ज्योतिष | |||||
१ | मौजे पुसेगाऊ | १ | मौजे कोट उर्वी | १ | मौजे भोसरे |
१ | मौजे वडूर |
एकूण देहाय १६, गावकुळकर्णे व ज्योतिषें पधरा व देशकुळकर्ण पा। मजकूर, हे निमे आपले सतोषे देतो आपली पाठी व साहेता पुरवावी. जे जे वेळेस जैसा प्रसंग पडेल तैसा आपण जीवानसी उभा. आणि स्वामीनें सर्वस्वे वित्तदतेसी आपली पाठी पुरवावी. ऐसे कृष्णाजी बुलगो, व मल्हार बुलगो, व गोमाजी बुलगो, व बाबाजी शिवदेव, व राधो शिवदेव, व मल्हार शिवदेव व समस्त पांच थोर ऋग्वेदी बोलिले हे गोष्टीस राजश्री रामचंद्र नीळकंठ यानीं मान्य केलें जे, तुह्मांस पांच पोर देशकुळकर्णी व गांवकुळकर्णी व ज्योतिषी ऋग्वेदी, पा। मजकूर, हे आपण पदरीं घेतले, आजीपासून हे आपले भाऊ, यानीं व आपण अथर्वण मजकूर देवमुखें व गोतमुखें व दामशाही मिराशीदार यांच्या विद्यमानें मारून काहाडावे, सदर्हू निमें वतन खावें, वडीलपण कृष्णाजी बुलगो व मल्हार बुलगो व बावाजी शिवदेव, व राघो शिवदेव यांसीं आधीं तश्रीफ व पानें, त्यामाघें रामचंद्र नीळकंठ यांनीं घ्यावी. बाजे हक्क, लाजिमा, सेव, धार व राबिता माहार दो ठायीं घ्यावें. हक्क जुने व नवे जें उत्पन्न होईल तें दो ठायीं खावें. यासी जो कोण्ही चुकेल त्यास श्री कृष्णवेणी साक्ष व वडिलाचे आण असे ; व मात्रागमनाचें पाप असे, व काशीस गाईब्राह्मणवध केलियाचें पाप असे. हे नेमपत्र सही.