Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४८ ] श्री. ३ एप्रिल १६९७.
राजश्री आबाजी सोनदेव भारद्वाज गोत्री गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र नीलकंठ अमात्य हुकुमतपन्हा नमस्कार. सुहुरसन सबा तिसैन अलफ. तुह्मीं हुजूर विदित केलें कीं, आपले आजेसासरे पोसो बहिरव यांचें पतक बाजारदरवाजा, कसबे पाटगाउं, येथील वतन होतें. तें त्याहीं लग्नामध्यें आपणास आंदण धारादत्त दिलें त्याचीं अर्पण पत्रे आह्मांपाशीं होतीं. त्या पत्रांवरून तेथें जाऊन पतकाची कमावीश करावी तों, धामधूम झाली. त्या प्रसंगांत अनुकूल पडलें नाहीं याउपरी आपण कर्नाटक प्रांतास गेलों. मार्गी जातां उपसर्ग झाला. यास्तव पत्रें होतीं ती गेली कांहींएक दिवस कर्णाटक प्रातीं होतों. तेथून राज्य सुगम झालें. राजश्री छत्रपति स्वामीची आज्ञा होऊन या प्रांतास आलों पतकाची कमाविश करावी तों, राजश्री शामराऊ मुरुबकर याणी पतकमजकुरास कोणी खावद नाहीं, याकरिता आपणांस पतकमजकूर वतन करून द्यावे, ऐसा गौरवाका स्वामीस सांगितला. त्यावरून स्वामीनें त्यास सिर्णी होन पा। ५० पन्नास रास घेऊन वतन करून दिले असे ये गोष्टीस सा, सात वरुषे झालीं पुरातन आपले आजेसासरे यांचें वतन त्याणी आपल्या मनोदयें करून दिलें त्यांचीं पत्रे होतीं तीं गेलीं परंतु ये गोष्टीतें साक्ष बहुतजण आहेत आपले वतन आपलें स्वाधीन करून वतनाची सेवा घेतली पाहिजे. ह्मणून त्यावरून ये गोष्टीची चौकसी करून मनास आणितां हमशाही वतनदार आहेत, त्यापाशी ये गोष्टीची गोही साक्ष मनास आणिता, तुमचे आजेसासरे पोसो बहिरव याणीं आपले वतन आदण धारादत्त दिल्हे, हे सत्य जालें याकरितां बाजारदरवाजा, कसंबे पाटगाउ, येथील पतक तुमचे, असे खरेखुरें झाले यास्तव, शामराऊ मुरुंबकर याणें पहिले पतकास कोणी खावद नाहीं. ऐसा गैरवाका सागितला, आणि वतन करून घेतलें तें त्याचे वतन दूर करून, त्यास सदरहू वृत्तीचीं पत्रें दिल्ही होतीं, ते कुलीं रद्द केली; आणि त्यास सरदहू वृत्तीशीं सबंध नाही ऐसे केलें असें. तुमचा सदरहू वतनाचा भोगवटा चालिला नाही याबद्दल तुमच्या माथां सिर्णी होन पादशाही १०० एकसें रास ठेविले. आणि त्याचा वसूल हुजूर घेऊन, तुम्हावरी कृपाळू होऊन, सदरहू वतन पतक बाजारदरवाजा, कसबें पाटगावीचें , अजरामरामत करून राजश्री अंताजी विठ्ठल देशाधिकारी प्रांत कुडाळ यांच्या नावे सनद सादर केली असे. ते तुमचे दुमाले करून चालवितील तुह्मीं पुत्रपौत्रीं वंशपरंपरेस अनुभवून सुखरुप पतकमजकुराची कमाविश करीत जाणें. या वतनास हक्क लवाजिमा महतकदम चालिला असेल त्याप्रमाणें तुह्मांस करार केला असे. तुह्मीं घेत जाणें. जाणिजे. छ २० रमजान. निदेश समक्ष.