Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४२ ] श्रीभवानीशंकर. ४ अक्टोबर १६९१.
नेमपत्र हजीर मजालसीयानी, मुकाम किले सातारा, सु ।। इसने तिसैन अलफ बतेरीख छ २१ माहे मोहोरम, आश्विन वदि अष्टमी रविवासरे प्रजापति नाम सछरे बेहुजूर शके १६१३ प्रजापति नाम छवछरे कार्तिक सुध त्रयोदशी मंदवारः-
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
या विदमाने लेहून दिल्हे नेमपत्र ऐसे जे राजश्री रामचद्र नीळकठ गोसावी यासी कृष्णाजी बुलगो व मल्हारजी बुलगो व गोमाजी बुलगो व बावाजी शिवदेव व राघो शिवदेव व मल्हार शिवदेव देसकुलकर्णी व गावकुलकर्णी व जोतिषी पा। खटाऊ सु।। इसन्ने तिसैन अलफ आपले वडील पुरातन मिरासीदार पिढी दर पिढी खात असता, दरम्यान कथळा करून विसाजी काशी व विठ्ठल होणाजी अथर्वण यानें कथळा करून कृत्रमी कागदपत्र करून वतनास खलेल करितो. दोनी चारी वेळा झाडाझाडी करून खोटा ऐसे खळकास वा हक्कदामशाह यांसी जाहीर असतां लाच देऊन जोरावरी करितो. आपण बेतकवी, खावयास नाहीं, भाऊ बंद तमाम माणसें दुकाळेनें अर्धली जाहाली; व गनीम मोगल वरजोर ठाणें देऊन पा। मजकुरीं बैसला त्यास माहादाजी निंबाळकर याचे कारकीर्दीस आह्मीं पांढरीवरी हजीर जाहालों हरदोजणांचा निवाडा जाहाला. अथर्वण खोटा जाहीरला, आणि कथळा करितो, ऐसे निर्वाह सर्वांच्या मुखीं जाहाला. कागदपत्र होवे, जमानिता कराव्या, पेस्तर बिलाहरकत न व्होवी, ऐसा तह जाहाला, तो अगदीं टाकून, अथर्वण विजापुरास जाऊन, लाच देऊन, लुस्पत देऊन, अगदींच आह्मांस मारावें, नांव कुलीं घ्यावयास नाहीं, ऐसे कागदपत्र करून पा। मजकुरास आला. आह्मांस धरावें ऐसा विचार पुरता केला. तो आह्मास कळला. व माहादाजी निंबाळकरास ही पादशाह याचे तलब रोखा आला. आह्मास कोणाचा असीरा नाहीं. हुजूर पादशाहानजीक जावें तरी आपण बेतकवेदार, आणि अथर्वणांनीं हुजूर भाविलें जे, राजश्री छत्रपती स्वामीचे दरबारीं मल्हार बुलगो व बावाजी सीवदेव यांस पंचहजारिया सांगितल्या आहेती, परगणे मजकुरावरी चाली करिताती, वतन आपलें बळेंच ह्मणताती. ऐसे किताका खेसीनें हुजूर गोष्टी भाविल्या आहेती. याकरितां आमचे पोटीं धास्ती पडिली व गाठोळीच्या बळें व गवसाळा करून, हुजूर पादशाह यानजीक जाऊन आपलें वर्तमान वतनाचें साकल्य जाहीर करावें तरी आपण गैरमहसरदार. याकरितां गनीमाचे दिवाणांत जावेना मग, वतन अथर्वणमजकूर जोरीनें खातो, गोतांत न ये, गनीमाची पाठीवर जोर केली, आपणास कोठें टिकों देईनातसारखें जाहालें. मग आपण डोईत धुळी घालून स्वामीपाशीं आलों. ऐसियांस, आपली व स्वामीची भेटी न व्हे, आपण निराश्रि ( त ), असीरा नाहीं. ऐसे चितन करीत दरबारीं बैसलों होतों. तों काशीराम कुलकर्णी, मौजे कांभेरी, किल्ले परळी यानीं आपणास विचारिलें जे, तुह्मीं कोणे गोष्टीअस्तव विशाळगडास का आला ? मग आपण त्यास बोलिलों जे, आपलें वतन अथर्वण बळें खाताती, भाऊबंद बेतकवी पडले, दावा दद न चले, यास्तव आपले वतनास व आपल्या जीवास कोणी त-ही धणी कासीपतो जाहालियावेगळे जीव वाचत नाही, वडिलाचे वतन सुटेना, ऐसा विचार आपला आहे, याकरिता दरबारास आलो ऐसियास, काशीराम आपणास बोलिले जे, तुह्मी भेऊ नका, परमेश्वर बरेच करील, आजीउदियात राजश्री पत अमात्य स्वामीची भेटी करून देऊन, मग तुमचा उदित काळ असल तरी बरेच होईल ऐसे बोलोन ते आपले बिराडास गेले आपण ही बिराडास गेलों दुसरे दिवशीं काशीराम यानी स्वामी ( स ) विदित केले.