Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. हैदराबाद येथें मध्यस्ताचा धाकटा पालक पुत्र गाजी उल्मुलक आहे. त्यास, अलीज्याह बहादुर साहेबजादे यांची कबुतरें सुटून आलीं तीं गाजी उल्मुलुक यांणीं धरून ठेविलीं. साहेबजादे यांचे माणसांसीं व गाजी उलमुलुक यांचे माणसांत कटकट होऊन परस्परें मनुष्य जखमीही जाली, साहेबजादे यांणीं कबुतरें आणविलीं. याप्रमाणें कटकटीचे वर्तमान हैदराबादेहून अखबार आली त्यांत आलें, र॥ छ १५ मोहरम हे विज्ञापना.
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. तैमुरशाहा दुरानी इरानचे बादशाही यांचा अंतकाल जाला, त्याजला च्यार षाहाजादे पैकीं मधील शाहजादे षाहा आलम बादशाहा गाजी दिलीचे पादशहा यांचा भाचा बहिणीचा पुत्र तैमुरशाहा याचे तक्तावर बसल्याची आखबार नबाबाकडे आली. हें वर्तमान मध्यस्तांनी सांगितल्यावरून विनंती लिहिली असे. र॥ छ १५ मोहरम हे विज्ञापना.