Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व० २ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. पंचोत्र्याचा अमल नवाबानीं आपले तमाम तालुक्यांत बसविला. प॥ वसमत येथें पंचोत्र्याची दखल करण्याकरितां करोड्याकडील येक कारकून व चोपदार व पन्नास स्वार येथून सैद मुनवरखान अमीन यांस पत्रें देऊन रवाना केलें. वसमतेस जाऊन पोंहचल्यानंतर सैद मुनवरखान यानीं दखल दिल्हा. येक दिवस राहून दुसरे दिवसीं पंचोतरा जारी केला. चौक्या भोंवत्या ठेवून पंचोतरा मन मानेल तसा करोड्याकडील कारकून घेऊं लागला, सबब वसमतचे पेठकरी, व गांवांतील लोक व बायका दोन अडीच हुजारा पावेतों मिळोन येकच बलवा करोड्यावर केला. दगडाचा मार च्यार साहा घटिकापर्यंत होऊन कांहीं स्वार व माणसें जखमीही जालीं. सैद मुनवरखान यास समजल्यानंतर त्यांनीं येऊन कजिया तोडविला. हें वर्तमान करोड्याचे कारकुनानें व चोपदारानें मध्यस्तास लिहिल्यावरून इतकें कृत्य सैद मुनवरखान व हैदरबेग सवदागर यांणींच केलें असें मध्यस्ताचे चित्तांत येऊन, येथून च्यारसें स्वार व पांचसें बार जमियेत रवाना केली कीं सैद मुनवरखान व सवदागरास पाठवून देणें, आणि पंचोत-याचा बंदोबस्त करून ज्याणीं बलवा केला, त्यांत षामील जाले असतील त्यांचेही पारपत्य करणें. याप्रमाणें ताकीद होऊन स्वार व बार रवाना झाले. पुढें याचें काय ठरतें पाहावें, र॥ छ १६ मोहरम विज्ञापना.