Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७९३.

विनंती विज्ञापना, मध्यरताचे बोलण्यांत आलें की लाडबहादुर कलकत्याहून चेनादपटणीस येणार; त्यांजकडे मीर आलम बहादुर यांची रवानगी करण्याची तजवीज केली आहे. कारण कीं, करनूलकर संबंधी टिपूकडील बेशकसीचा जाबसाल, याचा बंदोबस्त होणें, दुसरें, तलालकोटा वगैरे ठाणीं इकडील असतां ज्यादती करून टिपूनें घेतलीं. सिंगनमला तालुकीयांत निमे आपला ह्मणतच आहे. इत्यादिक जाबसाल लाडांसी बोलून बंदोबस्त जाले पाहिजेत. याजकारतां यांची रवानगी जरूर. याजवर आह्मी बोलिलें कीं इतकींच कामें आहेत किंवा आणीक कांहीं आहे. मध्यस्त बोललें, असेंच दुजबाबसाल आहेत. काहीं विशेष नाहीं; परंतु, गेल्यानें बंदोबस्त होइल. याजवर आणीक मी विच्यारिलें कीं "अशा कामास मीर आलम बाहादुर यांनी जावें लागेल की काय ?" तेव्हां मध्यस्तांनी उत्तर केलें कीं जें "मीर साहेब यांस वाकफी येत आहे. याजकरितां यांचे जाण्याचा बेत केला आहे. याचा इतला तुह्मी सरकारांत ल्याहावा, आणि उत्तर आणवावें, ह्मणजे यांची रवानगी करण्यांत येईल. कदाचित सलाहास असें आलें की:- 'जुजबी काम, याजकरितां मीर साहेब यांस कशास पाठवावें ? पत्रांत जाबसाल लिहून पाठ्यूनच उगवावें.' असें उत्तर आलियास तसेंच करावयास येईल " ह्मणोन सांगितलें, त्याजवरून सेवेसीं विनंति लिहिलीं आहे. याचे जाबाची आज्ञा लौकर जाली पाहिजे र।। छ १५ माहे मोहरम है विज्ञापना.