Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.
विनंति, उपरि-मौजे वाघोली प।। धारूर हा गांव गणपतराव माधव यांजकडे. हालीं राजे तेजवंत यांस जागीर जाला. त्यांजकडून राये लक्ष्मीचंद आले. त्यांणीं ठाण्यास उपद्रव दिल्हा. आणि यास लिं कीं:--- ठाणें खालीं करून देणें, व्यर्थ खर्चाखालीं न येणें. याचा हुजूर जलसा होऊन राजश्री गोविंदराव कृष्ण यांणीं साफ सांगितलें कीं:-- तुम्हीं आपलें ठाणें सुखरूप घेणें. या प्रा लक्ष्मीचंद याणीं पत्र लिहिलें त्याची नकल प॥, त्यावरून ध्यानास येईल, हा मजकूर आनंदराव गणपतराव याजकडील. कोणीं श्रीमंत राजश्री नानास जवाब साफ लिहितो कीं येक दाम न देणें. त्याजवरून आह्मीं, सखो जिवाजी यांचे नांवें पत्र लिहून दिल्हें कीं:-तुमचे खर्चाविसींचा म॥र फखरुदौला यांचें लि। वरून मध्यस्तांनीं आह्मांस सांगितला. त्यास, तुह्मांस खर्चाची जरूर असल्यास जगधन यांचे दुकानींहून वीस हजार रु। खर्चास घ्यावे. त्याचे दुकानावर चिठी दोन लक्ष वीस हजार सातसें नवद रु। पंधरा आणे याची जाली, ती पुण्यास रवाना केली आहे. परभारें तुह्मांकडे येईल. त्या ऐवजांत सदरहू वीस हजार घ्याल ते मुजरा द्यावे ह्मणोन पत्र लिहून जगधन याचे दुकानीं मध्यस्ताचे सांगितल्यावरून दिल्हे आहे. याचा इतला तुह्मास आसावा ह्मणोन लिं आहे. र॥ छ। २९ मोहरम. हे विनंति.