Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि. तेजसिंगाकडील जागिरीचे माहाल येहतषाम जंगाकडे जाले. येविषिं र। नाना तुम्हासीं बोलले कीं:--- सरकारचा ऐवज खंदारकराकडे येणें. त्या ऐवजीं करडखेल, होकरणें हे माहाल लाऊन दिल्हे असतां दरमियान फौज पाठऊन घेतले. ते समंई हिसेबी ऐवज निघेल त्यास नांदापुर लाऊन देण्याचा करार असतां वलीजंगास नांदापुर देऊं लागले. ते समंई मध्यस्तासी नांदापुर आमचे ऐवजीं केलें। असतां यास कसें देतां ? हें बोलावें कीं नाहीं ? व जंग घराउ पुसों लागले त्यास तुम्हीं नांदापुर कबूल करूं नका असें म्हणावें कीं नाहीं ? हे गोष्ट कसी राहिली ? इत्यादिक तों लिं त्यास करडखेल राज्याजीकडे जागीर होऊन तालुक्याचे दखलास यांजकडील फौज गेली. ते समंई यांचे बोलणें कीं:---खंदारकराकडे येकंदर स्वराज्याचा ऐवज तुमचा येणें, त्या ऐवजीं करडखेल व होकरण्याचा वसूल काय पावला व बाकी काय राहिली याचे हिसेब आणवावे. अजरुये मवाजा हिसेबीं ऐवज निघेल त्यास नांदापुर हा महाल. खंदारकर तेजसिंगाचे जागिरीचा-लाऊन देतां येईल. आमचे म्ह ( ण ) णें कीं----सेवालें हा महाल उमरखेडालगता. तो ऐवजीं लाऊन द्यावा, ऐसें बोलणें. त्याजवर हिसेब येऊन ठराव व्हावा तो काहीच जाला नाहीं. खंदारकराबाबत ऐवजाचा फडच्या करून द्यावा. सेवालें नांदापुर आमचे ऐवजी माहाल, हें हमेषा मध्यस्तासीं बोलण्यांत येतच आहे याचें विस्मरण कसें होईल ? येहतषामजंगास जागीर होण्याचे पूर्वी मध्यस्तासी बोलणें जालें. यांचे म्ह (ण) णें कीं:----तुमचे सरकारचा ऐवज बाकी काय ? याचा हिशेब आणाववा. सेंवाले नांदापुराचाच आग्रह काय आहे. वाजबी बाकी निघेल त्याचा फडच्या तेजसिंगाकडून करउन देउं; आगर नांदापुर लाउन देणें जाल्यास तसे घडेल, हिसेब यावा. ऐवज तादाप काय राहिला ? हें मुख्य यांचे बोलण्यांतील रहस्य. त्यास, हालीं तुम्हीं लिं कीं हिसेबही मागाहून पाठवितों, फार उत्तम आहे. हिसेब पाठउन द्यावे म्हणजे मध्यस्तासीं बोलण्यांत येईल. मध्यस्ताचे म्ह ( ण ) णें:--- सेंवाले नांदापुर हे। सरकारांतच आहेत. जंगांसीं दिल्हे म्हणोन कोठें गेलें नाहींत, तुम्हांस आपले फडच्याची गरज, तालुक्यासी काय कारण ? ऐसें म्ह ( ण ) णें. यास विचार पाहतां माहाल आपले सरकारांत लाउन देणें ते संमंई जंगाकडून देवण्यास काय उशींर आहे ? येहतषामजंग घराउ पुसों लागले ते समंई नांदापुर घेऊं नका ऐसे त्यास म्हणावें कीं नाहीं ? ऐसा लेख. त्यास, आह्मीं जंगास म्हणावें, याणीं महाल टाकावा, मध्यस्तांनीं त्यास विचारावें, तेव्हां आम्हीं सांगितलें हें बोलणें प्राप्त, इत्यादिक लांबचे लांब बखेडा पडतों. आणि जंगास तुम्हीं माहाल हा नका घेऊं म्हंटल्यांत फळही नाहीं. हें बोलणें मध्यस्तासीं त्यांज कडूनच होणें तें व्हावें, याचें त्यांसी हमेषा बोलणें होतच आहे. हिसेब आणवावा ऐसें म्हणतात त्यास हिसेब पाठवावा. त्याप्र।। बोलतां येईल. र॥ छ २९ मोहरम हे विनंति.