Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.
विनंति, उपरि. प्रथम मध्यस्तास फर्दा दाखविल्या; ते वेळेस यांची उत्तरें काये ? ऎसें आह्मीं पुसिल्यावर मनांत कोंडून कांही गोष्टी बोलिले, त्यांत निश्चयाची गोष्ट ल्याहावया जोगती येकही नाहीं. कांहीं उत्तर करावें म्हणोन कालवाकालव करून बोलिले. सेवटीं बोलिले कीं:-- दोचौ दिवसां याजविषंई तुह्मासीं बोलूं. बलकी मीं येखादें पत्र ल्याहावें असें ठरल्यास लिहून देईन व तुम्हांसही ल्याहावयास सांगेन. त्या प्र॥ लिहून उत्तर आलियावर मग फर्दांचे ठरेल. या बोलण्याचा अर्थ आमचे मनांत आला जेः----फर्दांचा मजकूर ज्यांस लिहिला तिकडून उत्तर आलियावर निश्चय बोलणें तो बोलावा. तों परियेंत कांहीं दिवस काळहरण करावें, याजवरही यांची उत्तराविसीं निकडच लागल्यास कांहीं येक उत्तर पर्याय लाऊन द्यावें म्हणजे च्यार दिवस काळहरण जाहलें, आशा लागली, तिकडील उत्तर आलियावर बोलणें तें बोलावें. असा बेत ठरला आहे. यास दुसरें प्रदर्शन:-बाबाराव यांचा निरोप आला. त्यांत ग्रहणाचे संधीचें निमित्य आणि मध्यस्त पाठ सांगतील त्या धोरणानें आम्हासीं बोलतील असें वाटतें. त्यास, आज उद्यां दोन दिवस ग्रहणाचे गेले म्हणजे आम्हीं मध्यस्तासीं जाऊन बोलतों म्हणजे काय ते समजेल. त्यासारखें लिहिण्यांत येईल. र॥ छ २९ मोहरम हे विनंति.