Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शकें १७१५.
विनंति, उपरि:-तफावत कांहीं ऐवजाची आहे. त्याचे रुजुवातीविषंई हालींच्या सुम्यास नवाजषनामा पाठविला. परंतु आमका ऐवज आमके दिवसांत देणें ऐसें जगधन साहुकार यास पत्र नाहीं. याविषंई दिकत पडेल ह्मणोन लि।।. त्यास, येकंदर, तनख्यांपैकीं एक लाख येकावन हजार दोनसें रु। सवा तेरा आणे १५१२०० ०।।।-। राव पंतप्रधान यांचे सरकारांत वसूल जाहला म्हणोन आहसनुदौला, कृपावंत या उभयतांनीं आपले मोहरेनसीं वसुलाची फर्द पाठविली. परंतु वसुलाप्र॥ रसीदा असाव्या त्या नाहींत. च्यार रसीदा मात्र आल्या. त्या यांणीं दिल्ह्या. यांत १६७९५ ॥ सोळा हजार सातसें पंच्याणव रु।।याची रसीद नाहीं. त्यावरून मध्यस्तासीं आमचें म्ह ( ण ) णें पडलें कीं:----सदरहूची रसीद द्यावी; अथवा रसीद नाहीं तरी ऐवज द्यावा. यांचें ह्मणण्यांत ऐवज पावला आहे. तेव्हां उभयतांनीं आपले मोहरांनसीं दस्ताऐवज पाठविला. आमचे म्ह ( ण ) ण्यांत ऐवज पावला नाहीं. असी दोनच्यार दिवस घिष्ट पिष्ट जाली. तेव्हां मध्यस्त बोलिले कीं:----ऐवज तो पावलाच आहे. नसेल पावल्यास या ऐवजाचा जिमा आहसनुदौला व कृपावंत यांचा. त्यास आमचें ह्म ( ण ) णें :---कृपावंत आटकेंत आहेत. त्याजवरून मध्यस्तांनीं आहसनुदौला यांचे नांवें पत्र करून दिल्हें कीं तुह्मीं येक लाख येकावन हजार सातशें पंच्याणव रू। सवा तेरा आणे याची फर्द मोहरीं लिहून पाठविलीं, त्यांत सोळा हजार सातसें पंचाण्यव रु॥ सवा चौदा आणे कमी येतात, याची रसीद नाहीं, याज करितां रावपंत प्रधान यांचे सरकारचे मुतसदी तकरार करून कबूल करीत नाहींत. त्यास, तुह्मीं ज्यांस सदरहू रु।। दिल्हे असतील त्यांची रुजुवात करून द्यावी. अथवा सदरहू रु॥, जे ऐवज मागावयास येतील, त्यांचे पदरीं घालून रसीद घेउन पाठवावी. मध्यस्ताचें ह्म (ण) णें :---हे रुपये पावलेच आहेत. त्यांत गुंता नाहीं. मगर तुमचा आग्रह कीं रु।। पावले नाहींत. याज करितां हें पत्र दिल्हें आहे. हें पत्र आहसनुदौलास पावतें करून यांचें उत्तर आणवावें ह्मणजे समजेल, त्यावरून हें पत्र घेऊन पाठविलें आहे. आहसनुदोला यांजकडे रवाना करावें. त्यांनीं रुजुवात करून दिलह्यास गुंताच उरकला. रुजुवात न जाल्यास त्यांजपासोन ऐवज घ्यावा. ऐवज न दिल्यास उत्तर लिहून पाठवावें. ह्मणजे यांस कायेल करून, जगधन याचे दुकानची चिठी घेऊन पाठवावयास येईल. सोळा हजार ऐवज द्यावाच असें ठरलें नाहीं. सबब जगधनावर चिठी नाहीं. आहसनुदौला यांस मात्र पत्र कीं ऐवज दिल्हा नसल्यास तुह्मीं देणें, त्यास ऐवज आहसनुदौलाच देतींल. त्यांणीं अनमान केल्यास लवकर लिहिलें यावें. र॥ छ २९ मोहरम हे विनंति.