Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
विनंति. उपरि, श्रीमंत राजश्री नानांनीं आज्ञा केली कीं गोविंदराव यांनीं आमचे नांवें पत्र लिहूं नयेत. श्रीमंतांचे नांवें विनंतिपत्रें लिहीत जावीं. तीन प्रकरणें मात्र लिहूं नयेत. मध्यस्त जवाहिर व ज्याफत नजर वगैरे वगैरे नबाबास करितात हें येक, शिकारी प्रकरण दुसरें बायका प्रकर्ण तिसरें, तीन मार येतील ते आलाहिदा आमचे नांवें ल्याहावे. बाकी मार श्रीमंतांचे नांवें लिहीत जावा. येणेंकरून त्यांस माहितगारी होईल. ह्मणोन राजश्री नानाचे आज्ञेवरून लि. त्यास तीन प्रकरणांव्यतिरिक्त सर्व मार माहितगिरी होण्याकरितां लिहित जावा ह्मणोन आज्ञा केली हें उचित. परंतु आद्याप राजकारणाचे उंच निंच प्रकार व लिहिण्यांतील तोडजोडी ध्यानांत नाहींत. आलम जवानीचा. पुर्ते मनन न होतां भलतेंच मनांत येईल, बोलतील याविषीं बहुत अंदेशा मनांत आले. परंतु येक खातरजमा चिताची आहे कीं पत्रें वाचून दाखविणें, आंतले भाव, गर्भ समजावणें ते राजश्री नाना आपले रुबरु समजावितील. त्यापक्षीं चिंता नाहीं. परंतु तुह्मींही विनंति करावी कीं आपले समक्ष पत्रें दाखऊन जेथें ध्यानांत न ये तेथें समजाऊन सांगावें. आणि समक्ष पत्रें श्रीमंतांस दाखविलीं तरच पाहतील. पाठीमागें पाहणार नाहींत. पत्रें पाहणार नाहींत तेव्हां ध्यानांतही येणार नाहीं. हा पूर्वीचा संप्रादाय ठाऊक आहे, त्यावरून लिहिलें असे. अलीकडील प्रकार कसा हें कांहीं समजलें नाहीं. हल्लीं पत्रें श्रीमंतांचे नांवें लेहून खुला लाखोटा पाठविला आहे. नाना यांस प्रथम दाखऊन आज्ञा कारतील त्याप्रा श्रीमंतांचे सेवेंत प्रविष्ठ करावीं. रा छ १६ मोहरम हे विनंति.