मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५.

विनंति. उपरि राजश्री जीवनराव पांढरे यांजकडे यैवज येणें. यास्तव पा अवराद व निटूर या दो माहालाचा यैवज मोकाशाचा आटकाऊन ठेवावा व मारनिलेचे आणि आनंदराव सभापत यांचें रहस्य करून द्यावें इत्यादिक मार तुम्हीं लिहिला. त्यावरून सजावरुदौला यांजकडे सांगोन दो माहालचे मोकाशाचा यैवज सन १२०२ सालचा आटकाऊन ठेविला. जीवनराव यांचे आनंदरायाचें रहस्यही करून द्यावें या तजविजींत असतां आनंदराव यांनीं परभारा सजावरुदौलाकडे राजयाजी यांचा निरोप पाठऊन यैवज आम्हांकडे ने द्यावा यैसें सांगितलें होतें व मध्यस्तासही परभारा सुचविलें कीं, हसनावाद व येकहलीं हे दोन माहाल पांढरे यांजकडे नवाबाचे सरकारचा यैवज येणें त्या यैवजीं सरकारांत घेतले आहेत. त्याचप्रा। सरकारचे रदकर्जी आवराद निठूरचा यैवज द्यावा याप्रों सांगोन यैवज आपल्याकडे येणें असतां असी दिकत घातली हेंही मध्यस्ताकडूनच आम्हांस समजलें. आह्मीं उत्तर केलें कीं, दोन माहाल पहिलेच आपले रदकर्जी आहेत. आवराद व निठूर हे जीवनराव यांजकडे चालते माहाल, याचा यैवज घेण्याची सा काय ? तेव्हां मध्येस्तांनीं राजयाजीस सांगितलें कीं, यांचा दस्तायैवज पाहण्यावर ठरलें आहे. सारांश तुम्हीं लिहिलें कीं, आपला यैवज येणें सा ते माहालचा यैवज’ आटकाऊन जीवनराव याजकडे न द्यावा. त्याप्रों केलें असतां आनंदराव यांनीं परभारा याप्रों उपस्थित केलें. यावरून आश्चिर्य वाटतें कीं तुमचीं पत्रें येतात तीं कसीं ! रघोत्तमराव यांचेंही पत्र आलें तो प्रकार कसा ?आणि वर्तणुकींत आनंदराव यांची चाल हे ! तुम्हींच समजावें. रा छ. १५ जिल्हेज हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries