Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. ९ मंगळवार शके १७१५.
भावसिंग चौधरी यानें पत्र मागितले सबब.
राजश्री याविराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी
पो।। गोविंदराव कृष्ण स।। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि।। जावें.
विशेष राजश्री गोपाळ नाईक वानवले यांचा ऐवज शंकरदास साहुकार हैदराबादकर यांजकडे सतराशें रुपये मुद्दल याजकरितां याचा मूल मनुलाल यास पैठण येथें वानवले यांनीं अटकाविलें येविषयीं रोशनराव व भावसिंग चौधरी यांनीं बहुत वेळ आम्हांस सांगितल्यावरून वानवले यांस पत्रें पाठविलीं, परंतु मनुलाल याची सुटका जाली नाहीं. सांप्रत भावसिंग चौधरी याचे मारिफात साहुकारी निशा सतराशें रुपये मुद्दल घेण्याची खातरजमा बशर्त मनुलाल येथें आल्यावर ऐवज घ्यावा. याप्र।। घेऊन वानवले यांस पत्र 'समागमें जासूद देऊन पैठणास पाठविलें. त्यास म॥रनिलेनी मनुलाल यास मोकळीक करूं नये. येथें पाठविल्यास उत्तम. कदाचित व्याज वगैरे आड करूं लागतील यास्तव तुह्मांस लि।। त्यास शंकरदास याजपासी देण्याघेण्याचा आहवाल कांहीं. नाहीं वाडा वस्तवांनीं गाहण ठेवून चौधरी यानें मोठे बलानें साहुकाराकडून निशापाती केली आहे यास्तव व्याज वगैरे तंटा कांहीं एक न करितां मुदल फेडच्यांत समजोन मनुलालास सोडून रवाना करावें. आह्मापासी पोहचते करून द्यावे, या प्र।। वानवले यांस तुह्मी परभारा लेहून सदरहु प्र।। अमलांत आणीत ऐसा बंदोबस्त करावा. र॥ छ. २२ जिल्काद बहुत काय लि।। लोभ कीजे हे विनंति.
छ. २३ रोजीं टप्यावर रवाना पत्रें.