मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
(शके १७१५ ज्येष्ट शुद्ध २ सोमवार. )

विनंति ऐसी जे-आजपावेतों पागावाले, सराफा, साहुकार, मुतसदी वगैरे मंडळीस छपरबंदी करण्याविषयीं नवाबाची आज्ञा जाली नव्हती. छ. २७ राजीं सर्वत्रांस ताकीद केली कीं आपलाली छपरबंदी करावी. त्यावरून छपराची तयारी होत आहे. नबाबाचे महालांतील बायका नव दाहा आसामी हैदराबादेंत आहेत. त्यांस आणावयाकरितां समशेरजंग व तेजपा पांडे यांची रवानगी करणार आहेत. छ. ३० सवाल हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries