मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
(शके १७१५ जेष्ठ शु. २ सोमवार.)

विनंति ऐसी जे. सेनासाहेब सुभा यांजकडून सांवतखान नबाब व मध्यस्तास लग्नप्रकर्णी पोषाग व जवाहीर घेऊन आले. आमचे विद्यमानें मध्यस्ताची भेट व नबावाची मुलाजमत जाल्याची विनंति पेशजी लिहिल्यावरून ध्यानात आले असेल, छ. २७ शवा मध्यस्तांनी सांवतखान यांचे रुखसतीविर्षी नबावासं अर्ज केल्यावरून खान मा यांजपाशीं सेनासाहेब सुभा यांचे पत्रांचे जाबाब देऊन रुखसत दिल्ही. सरपेंच इनायत केला, खानासमागमें राजश्री भवानी काळे यांनीं आपल्याकडील लाला ब्रिजमल यास दिल्हें, त्याचीही रुखसत होऊन विडे दिल्हे. या उपरी मध्यस्ताचा निरोप घेऊन आह्मांकडे येणार. येथून खान मार रवाना जाल्याचें वर्तमान मागाहून विनंति लिहितों. ।। छ. ३० सवाल हे विनंति.

अखबार ई॥ छ. १९ माहे शवाल त।। छ, २९ मिनहूपर्यंत. ( शके १७१५ वै० व० ५ गुरुवार-ज्येष्ठ शु० १ रविवारपर्यंत.

छ. ६. रोज टपा, रवाना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries