Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
( शके १७१५ ज्येष्ट शु. २ सोमवार.)

विनंति ऐसी जे. मनसुकराये कायत पेशजी जोरावरजगं मरहुम यांजकडोन प॥ आंबेजोगाई व पा सेलगांव पा परळी येथील अमीलीचे कामावर होता. त्याजवर माहासबा काढोन कैदेंत ठेविलें. तेथेंच मृत्यु पावला. त्याचा पुत्र व्रजलाल भोंसल्यांचे येथें नोकर होऊन सांप्रत सांवतखान आले यांचे बराबर भोंसले यांनीं पाठविल्यावरून आला. सर्वांच्या भेटी गोष्टी जाल्या. दोनच्यार दिवस जाल्यानंतर जोरावर जंग मरहूम यांचे मामा व विश्वनाथपंत वकील यांनीं नबाबास अर्ज करून मध्यस्तांस सांगितलें की, याचा बाप-जोरावरजंग याचा माहासवेदार-कैदेंत मेला ते समंई सर्व जिनस आज नास (?) जरजवाहेर ब्रिजलाल नागपुरास घेऊन जाऊन तेथें आश्रय करून राहिला. हल्लीं आला आहे. आमचा फडच्या करून देवावा. त्यावरून लाला म।।र यांस आणून बसविलें, सांवतखान यांस नबाबाचा निरोप जाला. मध्यस्ताचा होणें तों लालाची हे दशा याजकरितां छ. २७ रोजीं मध्यस्तीकडे येऊन फार रदबदल केली कीं, मजसमागमें आला आहे. याजकरितां यास बसवूं नये, मध्यस्तांचे ह्म ( ण ) णें कीं, तुह्मी आपला जिमा करून लिहून द्यावें कीं नागपुरास गेल्यानंतर यास पोंहचाऊन देऊं; नाहीं तर याचे जिम्याचा जाब करूं. त्यास सावंतखान लिहून देण्यास अनमान करितात. यांजमुळें च्यार दिवस खानाचे जाण्यास तामुल जाला आहे. हे रदबदल जाल्यानंतर खान मा यांनीं मध्यस्तांस सांगितलें कीं, पांचा हजारांचे कापड गदवालचे भोंसले यांचे येथें जाणार त्याचे महसूल माफीचें दस्तक देवावें व दाहा बाहेरी परीद्याचे सिकारी सिकाकोल राजबंदरीहून येणार त्याचें एक दस्तक एकून दोन दस्तकें देवावीं. त्यावरून मध्यस्तांनीं दोन दस्तकें आपले मोहरेचीं करून देवावीं. रा छ, ३० सवाल हे विनंति.