Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
महाराष्ट्र इतिहास.
खर्ड्याच्या लढाईचा पत्रव्यवहार.
( गोविंदराव काळे यांचें दफ्तर.)
सरकारी-नानास.
श्री.
( शके १७१५ ज्येष्ट शु. २ सोमवार.)
विनंति ऐसि जे. छ. २६ (वै० य. १३ गुरुवार ) रोजीं बाबाराव मध्यस्ताचे सांगितल्यावरून आमचे घरास चार घटका दिवस शेष राहतां आले. परस्परें आगतस्वागत बोलणें आलें. राव म।।र यांनीं तिकडील म॥र व आपले कर्ण्याचा व मजबुतीचा भाव सर्व सांगितला कीं, “ मी पांचच्यार वेळा राजश्री नानांकडे गेलों होतों. त्यांचेही बोलण्यांत सर्व प्रकारें स्वच्छता आहे. कोणेही प्रकारें तर्फेनचे जाबसालाचा उलगडा व्हावा, येविषयीं मजलाही आज्ञा केली होती, त्याप्रमाणें सर्व दरजे मी मध्यस्तांसी बोलोन यांची मर्जी हमवार केली आहे, त्यास प्रस्तुत मदारुलमहाम यांचीं पत्रें व यादी आपल्याकडे आल्या असतील त्या काढाव्या, त्याची भवनि न भवति करून कलमें नेमांत आणावीं, याचें उत्तर मीं यांसी केलें कीं, * पत्रें अथवा यादी अद्याप आल्या नाहींत, येतील. त्यास, येथून यानीं दसखतें ठरावून गोविंदराव व रघोत्तमराव यांजपाशीं दिल्या आहेत; त्या दसखतांची तेथें भवति न भवति होऊन त्याजवर मदारुलमहाम जवाव लिहितील ते आल्यानंतर यांनीं मंजूर करून नेमांत आणावें, ह्मणजे फडच्या. त्या यादींच्या नकला आह्मांपाशी आहेत, परंतु तेथून करार होऊन आल्या नाहींत. मग भवति न भवति केल्यांत फल काय ? १) याप्र॥ यांसीं बोलणें जालें. बाबाराव यांचें ह्म(ण)णें कीं, “प्रस्तुत यादी आणि पत्रें मदारुलमहाम यांजकडून आपल्याकडें आल्या ऐसें कल्याणराव यांनी लिहिलें आहे.'' मी बोललों की “यादी आल्यास त्या तर तुह्मांसी छपावून ठेवितों? येणार आहेत. पहिल्या यादी पहावयाच्या असल्यास आहेत. पाहाव्या. त्याजवर दसखतें कसीं करावीं त्याचे मसोदे ठराविले त्याचा निश्चयही अद्याप पका नाहीं. गोविंदराव तेथें बोलून सरकारची आज्ञा येईल त्याप्रमाणें बोलण्यांत येईल." ऐसें सांगितले. त्याजवरून ते कल्याणराव यांजकडे ऐसेंच लिहुन पाठवितील–ध्यानांत असावें. र॥ छ. ३० सवाल हे विनंति.