Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
छ ५ जिलकाद अखबार
ज्येष्ठ शु।। ६ शके १७१६ बुधवार ता. ४।६।१७९४
रवाना छ ६ आवाल.
श्री.
विज्ञापन ऐसीने येथील वर्तमान ता छ १९ माहे, शवाल सोमवार पावे. तो अखबार पत्रीं लेखन करून सेवेसी पत्राची रवानगी कली त्यावरून ध्यानास आले असेल. तदनंतर येथील वर्तमान रात्रीं दौलाची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. घांसीमिया यांनीं नवाबास मलाजमत केली होती. त्यांचा सरंजाम मिठाई दीडमण वजन व फुलें गुलाब पानें सुपारी व पंचवीस मोहरा नजर गुजरली. छ २० रोज मंगळवारी लालबागामधें तीन घटिका दिवसां नबाब आले कुहीरचे आबे जनान्यांत बटवडा करून दिल्हा. रात्री दौलाची याद केली, ते हजर जाले, पांच घटिका रात्रीं नबाब नवे बंगल्यामध्यें बरामद जाले. मीरआलम व पागावाले वगैरे मामुली इसमाचा सलाम जाला. मिस्तर किरकपात्रीक वकील इंग्रजाकडील अला. त्यानें कल' कल्पाचे जनरल चें पत्र गुजराणिले. रोशनराव यानीं शादीची नजर केली. लखनउचें कंचनीचा नाच होता. दौला व मीर आलम व किरकपात्रीक यांसी खिलात जाली. येकप्रहर येक घटिकेस बरखास जाले. छ २१ रोज बुधवारी दिवसा दरबार जाला नाही. व्यंकटराव सुरापुरकर आल्याचा अर्ज जाला. त्यास इस्तकबाल राज्याजीचे भाऊ आपाराव व राज्याजीचे पुत्रास पाठविलें. दौलाची याद केली. व्यंकटराव यांनीं राज्याजीचें बंधुसह पुत्रास पोषाग व सरपेच दोन दिल्हे. पांच घटिका रात्रीं बंगाल्यामध्यें नवाब बरामद जाले. दौला व पागावाले व रायेरायां वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला. व्यंकटराव सुरापुरकर यांची मुलाजमत पांच इसमाची होऊन नजर जाली. दौला व व्यैकटराव यांसी दोन घटका बोलणें जालें, लखनउचे कंचनीचा नाच होऊन यक प्रहर तीन घटिकेंस बरखास जाले. छ २२ रोज गुरुवारीं दिवसां दरबार नाहीं. रात्री दौलाची अर्जी वे धारणेचा निरखबंद गुजरला, छ २३ रोज शुक्रवारी दिवसां लालबागेमधें जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ २४ रोज मंदवारीं लालबागेमध्यें तीन घटिका दिवस नबाब आले, जनान्याचा बंदोबस्त जाला, बहलोल खानाकडील अर्जी गुजरली. रात्री कंचन्याचें ताफे बोलाऊन नाच रागरंग अतषबाजी रोषनाई जाली छ २५ रोज रविवारीं दिवसा दरबाराची खैर सला. रात्रीं पाच घटिकेस नबाब दिवानखान्यामधी बरामद जाले. दौला व पागवाले भुनसी व रायेरा। वगैरे इसमाचा सलाम जाला. दौलासी खिलवत जाली. भोसल्याकडील पत्र माधवराव. रामचंद्र यांनी गुजराणिलें. येक प्रहर येक घटिकेस बरामद जाले. छ २६ सोमवारी दिवसा लालबागेमधें जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्रीं साहा घटिकेस दिवानखान्यामध्यें नबाब बरामद जाले. दौला व पागावाले व रायेराया वगैरे मामुली इसमांचा सलाम जाला. कादरखान अमील खममेठ, याची मुलाजमत नजर जाली. रावजीकडे, येण्याविसी सांगोन पाठविल्यावरून आले. सलाम जाला. दौला व रावजीसुधा खिलवत जाली, व्यंकटराव सुरापुरकर यास आदवनी रायेचुर वगैरे माहालाचे काम सांगितले, खिलक्त इनायत जाली. रुखसतीचें पानदान दिल्हें. महमद अमीखान आरब याची अर्जी दौलानी गुजराणिली. यक प्रहर च्यार घटिकेस बरखास जाले. छ २७ रोज मंगळवारी प्रात:काळी दौलाचे हवेली परियंत खांच देण्यास हुकुम जाला. दौला व गफुरजंगाकडील व असदअलीखानाचा जनाना लालबागेंत येऊन बंदोबस्त जाला, गोपाळ पेठेचे जमीदारानें चोबी बंगला दोनखणी तयार करऊन नबाबास पाठविला तो गुजरला, दिवसां दरबार नाहीं. रात्री दौलाची अर्जी गुजरती छ २८ रोज बुधवारी दिवसा लालबागमधे जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. नाचरागरंग आतषबाजी रोशनाई जाली. भवानी मीर्धा यांचे घरास आग लागुन दग्ध जाले. अर्ज जाला. छ २९ रोज गुरुवारी प्रहर दिवसा ख्वाबागामधे नवाब बरामद जाले सेखउमरखान वगैरेचा सलाम जाला. लालनहजामाची याद केली. हजामत होऊन येक प्रहर तीन घटिकेस बरखास जाले. रात्री बहलोलखानाकडील अर्जी गुजरली छ. ६० रोज शुक्रवारी दिवसा खैरसला, रात्री मीरपोकद अली याचे कबील्याकरिता मिठाई पंतास खाने व फुले चंगे-या व पाने सुपारी इलाची लवगा बदाम मिश्री खारीक खोबरे वगैरे सरंजाम हीसा मुदौला अर्जबेगी व यकरामुदौला खानसामा याजसमागमे नवाबानी दौलाचे हवेलीस पाठविले. पोषाग यक व जवाहीर आदद पांच या प्रो। सरंजाम दौलाचे हवेलीस आणिला. दौलानी अर्जी पाठविली, चंदाकंचनीचा नाच होता. छ १ माहे जिलकाद मंदवारी यक घटिका दिवसां लालबागामधे नवाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. छ २ रोज रविवारी दिवसां दरबार जाला नाहीं. रात्री च्यार घटिकेस फुलाचे हार दान दौलाकडे पाठविले. दौलाची अर्जी गुजरली. छ ३ रोज सोमवारी दिवसा खैरसला. रात्री दौलाची सिदी अबदुल याची गंजीकोटयाहुन अर्जी आली त्यासुधा गुजरली. छ ४ रोज मंगळवारी दोन घटिका दिवसां लालबागामधे जनान्याचा बंदोबस्त जाला. रात्री पांच घटिकेस दिवानखान्यामधें नवाब बरामदजाले. दौला व पागावाले व राथेराया व मुनसी वगैरे इसमाचा सलाम जाला, व्यंकटराव मजेवार जमीदार हातनुरकर यास रुखसत जाली. कंचनीचा नाच पाहुन यक प्रहर यक घटिकेस बरखास जाले. छ ५ रोज बुधवारीं हुमणाबादेहुन तोफ लांबी दाहा गज दोन गिरे आली. जिनसीत दाखल जाली. दिवसां दरबार नाहीं. रात्री दौलाची अर्जी गुजरली. या छ ५ माहे जिलका हे विज्ञापना.
सदरहु पत्रें श्रीमंतांस अखेर साला परियंत मामुल,