Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष व ३० शुक्रवार शके १७१५ ता. ३१ जानेवारी १७९४.

श्रीमंतरावसाहेब यांस हवाल्याचे पत्र.
वरील पत्राचा पृष्ठांक २६ ३ आहे. पुढें ३०६ पावेतों पृष्ठे उपलब्ध नाहींत. संपादक.

माघ वा १२ गुरुवार शके १७१५ ता. २७ फेब्रुवारी १७१४.

++ + रुदौला व अजिमुदौला यांच्या नजरां जाल्या. नाच रागरंग पाहुन येक प्रहर साहा घटिकेस जनवाड्यास दाखल जाले. छ २० रोज शुक्रवारी दोन घटिका दिवसां नवाब नदीकडे जाऊन माशाची शिकार करुन दोन प्रहराचे अमलांत आले. दारकोजी पाटणकर यास इस्तकबाल बबचींखान्याचे दारोगे यास पाठविले. रात्रीं साहा घटिकेस नवाब दौलाचे मकानास आले. दौला व पागावाले व अर्जबेगी व मुनषी व रायेरायां वगैरे मामुली इसमांची सलाम जाला. दारकोजी पाटणकर यांची मुलाजमत होऊन अकरा इसमांची नजर जाली. हषमतजंगाचे पुत्रास मातमपुरसी तीन पारचे कारचौबी दिल्हे. कंचन्याचा नाच होता. दौलांसी बोलणें होऊन येक प्रहर दोन घटिकेसे बरखास जालें. छ. २१ रोज मंदवारी प्रातःकालीं नबाब नदी किनारियास गेले. सैर करून एक प्रहर तीन घटकेस जनवाड्यास आले. तीन प्रहरास फिरोन नवाब सवार होऊन गेले. दौला हुकमाबमोजीब आपले चावडीवर गेले. रात्रीं नाच, रोशनी, आतषबाजी जाली. छ. २९ रोज रविवारीं प्रातःकाळीं सैद उमरखां यानें मासे धरुन गुजराणिले. प्रहराचे अमलांत जनवाडयास आले. येक प्रहर पांच घटिका दिवसां ख्वाबगामध्यें नबाब बरामद जाले. जंगु व मनुचा सलाम जाला. लालन हजामाची याद केली. तो हजर हजामत होऊन दोन प्रहरास बरखास जालें, लोदीखानास इस्तकबाल मुजाहिदु दौलास पाठविलें. च्यार घटिका दिवस राहात नवाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस नदीकडे गेले. लोदी खानाचे पुत्रास मातमपुरसी तीन पारचे दिले, महमंद हुसेनखा घटाल्या तालुक्यांतुन दोनसें स्वारानसीं लस्करांत आला. अर्ज जाला. छ २३ रोज सोमवारीं येक प्रहर च्यार घटिका दिवसां नवाब जनवाड्यास आले. दौलांनीं कंदुरीची तयारी करुन अर्जी पाठविली. त्याजवरून दोन प्रहर दोन घटिका दिवस नवाब दौलाचे येथें आले. भोजन होऊन दोन प्रहर च्यार घटिकेस दौला व मीर आलम व पागावाले वगैरे इसमांचा सलाम जाहला. नाच रागरंग पाहुन येक प्रहर येक घटिका रात्रीं हवेलीं गेले. छ २४ रोज मंगळवारीं तीन घटिकां दिवसां नवाब सवार होऊन नदीकडे गेले. च्यार माशांची शिकार करून येक प्रहर साहा घटिकेस आले. तीन प्रहरास दौला येकरामु दौलाचेथे जाऊन आले. मगरबाचे समई नवाब येकरामुदौलाचे घरास गेले. दौलाही हजर जाले. नाच रागरंग पाहुन बरखास जाले. येक प्रहर दोन घटिकेस हवेलीस गेले. छ. २५ रोज बुधवारीं दोन घटिका दिवसां रथामधें नवाब सवार होऊन इसलामपूरचे नाल्याकडे गेले. सीकार न होतां येक प्रहर साहा घटिकेस फिरोन आले. मीर पोकदअली व सुभानअली व जुल. फुकरअली तिघे साहेब जादे यांचे कबीले हैदराबादेहुन आले, बखतमलाच दत्तपत्र भेला, सबब दुकान जप्ती करविलें. रा छ २६ रजब हे विज्ञापना.