Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

छ २९ रजबीं संक्रमणाचे तिळाचा जाब निंबाजी ना यापासी जिल्हा,

श्री
फाल्गुन शु. १ रविवार शके १७१५ ता. २ मार्च १७९४.

श्रीमंत राजश्री-------राव साहेब

-स्वामीचे सेवेसीं

विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार विनंती विज्ञापना. ता। २९ माहे रजब पर्यंत मा जनवाडा येथे स्वामीचे कृपावलोकने करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष सरकारांतून छ. १० माहे जाखिरचे पत्र सादर जालें तें छ. ११ माहे माारी पावले. “त्यांत मकर संक्रमणाचे तिळ शर्करायुक्त पाा आहेत, घेणे " ह्मणन आज्ञा, यैसीयास पत्र व संक्रमणाची थैली सिरसा वंदन करून स्वामीरीवामृतसंतोषसंपन्न सेवक सनाथ जाला, सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
या छ ४ माहे शाबान रवानगी डाकेवरुन,

श्री.
फागुन शु. शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४,

श्रीमंत रावसाहेब यार: मामुली हवाल्याचे पत्र,

फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४. | विनं: विज्ञापना. दौलाची नात सैफनमुलुक यांची कन्या गफुरजंगाचे लेकीपार ने जाली ती मीर पोलादअली सिकंदर ज्याहा बाहादुर साहेब जादे यांस देण्याचा निश्चय होऊन छ, ३० माहे रजबीं पखतखोरी जाली. नवाब दौलाचे घरास आले. जनानाही समागमें होता. सारबतखारीचा समारंभ । दौलांनी नवाबास व महालांत नजरा केल्या. सिकंदर ज्याहा यांस चढाबापाचे खाने पोषाग व जवाहीर सरपेच जिगी कंठी व तुरा भुजबंद या प्रो मीर आलम व अर्जबेगी या समागमें पाठविला. षादी छ. १९ माहे धाबानापासून सुरु होणार. सैफनमुलुक यांची दुसरी कन्या हरम अणजे राखीचे पोटची ते असद अलीखानाचे पूत्रास देण्याचा नेम धरुन याचीही शरबतखोरी व चढावा छ माारीच जाला. । छ. ४ माहे घोबान है। विज्ञापना.