Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष व. ९ शनिवार शके १७१५ ता. २५ जानेवारी १७९४.

विज्ञापना येसीजे. येथील वर्तमान ता। छ, १९ माहे जाखर बुधवार पावेतों अखबार पत्रीं लेखन करुन सेवेसीं पत्राची रवानगी केली त्यावरुन ध्यानांत आलें असेल. तदनंतर येथील वर्तमान. छ. मारीं रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. रायेरायां यांस हुकुम जाला जे जनवाड्यास जाऊन बाडा बसवणें, छ २० रोज गुरुवारीं तीन घटिकां प्रथम दिवसां लालबागांमयें नवाब बरामद जाले. जनान्याचा बंदोबस्त केला. नवा दिवाणखाना पाहिला. त्यानंतर येक प्रहर च्यार घटिका दिवसां खिलवतीमधें नवाब बरामद जाले. आषज्या उलमुलुक व येकरामुदौला वगैरे लोकांचा सलाम जाला. रायेरायां यांनी प्रात:कालीं जनवाड्यास जाऊन बाडा बसविल्याची अर्जी पा।. ते दौलाचे अर्जी सहित गुजरली. लालन हज्यामाची याद केली. तो हजर जाला. हज्यामत होऊन येक प्रहर सात घटिकेस बरखास जाले. दौलाची अर्जी गुजरली. उदईक कुच करून जनवाड्यास जाण्याचें दसखत जालें. छ २१ रोज शुक्रवारीं गजर समईं प्रातःकाली सवारीचा हुकूम होऊन लवाजिमा हजर जाला, जनान्याचे रथ पुढे रा केले. दौला व पागावाले व मुनषी व असदअलीखां वगैरे सरदार मनसबदार मुतसदी सर्व हजर जाले. लालबागामधें नवाब बरामद जाले. सफेत पोषाग वे
हि-याचे जवाहिर घालुन हाथी जर्दगदीचा त्याजवर नबाब सवार जाले. पिछाडीस मनु छत्री घेऊन उभा होता. दौला व मीरआलम व सरबुलंदजंग व घांसीमियां व अजमखा वेगळाले हाथीवर, याप्रा सवार होऊन दिली दरवाज्यानें शुक्लतीर्थाचे रस्त्यानें येक प्रहराचे अमलांत जनवाडे येथें दाखल जाले. रा। छ. २२ जाखर हे विज्ञापना.

छ २८ जाखरी डांकेवर.