मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
पौष व. ९ शनिवार शके १७१५ ता. २५ जानेवारी १७९४.
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचें पत्र.

श्री.
पोष ब. ९ शनिवार शके १७१५ ता. २५ जानेवारी १७१४

विनंती विज्ञापना. नवाब कमठाण्याहुन छ. १६ माहे जाखर बुधवारीं बेदरचे हवेलीस दाखल जाल्याचें वर्तमानाची विनंती डांकेवर यापूर्वी लिहिण्यांत आली आहे. छ. २० रोज गुरुवारी बेदर येथें मुकाम जाला. छ. २१ रोज शुक्रवारीं प्रात:काळी नवाब गदीचे हाथीवर सवार जाले. दौला व मीरआलम व पागावा आदिकरून अलाहिदा हाथीवर, याप्रा स्वार होऊन प्रथम प्रहर दिवसां जनवाड्यास दाखल जाले. बाडा अगोदर रायेराया यांनी जाऊन तेथें बसविला आहे. येक महिन्याचा सरंजामही तेथें गेला. इतक्यावर जनवाडे येथें किती मुकाम होतात पुढें कोणीकडे जातात हें ठरेल साप्रा। विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल. रा। छ. २२ जाखर हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries