Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. सरकारचें पत्र छ. २९ माहे जिल्हेजचें राजश्री गणपतराव माधव यांजकडून आलें तें छ, १४ सफरी पावलें. त्यांत“मौजे वाघोली बु।। पा कजे धारूर हा गांव जागीर राजश्री गणपतराव माधव यांजकडे सरकारांतून आहे, त्यास भारमल नवाबाकडील याचा उपसर्ग लागतो. येविषीं नवाबा निजाम अलीखां बहादुर यांसी बोलोन बंदोबस्त करणें” ह्मणोन आज्ञा सादर जाली. त्यास मौजे मजकुरास भारामलीकडील नायबाचा उपसर्ग येविषईचें वर्तमान समजल्यावरून सरकारचे पत्रापूर्वीही हा मार दौलासी तीन च्यार वेळां बोलण्यांत आला. सांप्रत सरकार आज्ञे वरुन निकड करून दौलांसीं बोलणें जालें कीं पेशजीपासोन श्रीमंताचे सरकारांत------ ( येथें येक सबंद पृष्ठ गहाळ झालें आहे. पृष्ठांक १२२ ) सं ........ (ठ )राऊन हरादो परगण्याची जागीर रुकनुदौला यांस दिल्ही. त्यांत हे दोन गांव वजा आहेत. रुकनु दौला यांस दिल्हे नाहींत. येविषीं दौलांस सांगोन हरदु गांवास तोसीस लागों न देणे. याप्रा सरकारी पत्रें. त्याच्या नकलां ह्या. त्या पक्षीं वाघोली व अरणी दोन्हीही गांव वजा आहेत. याजवर दौलाचें बोलणें कीं “आमचे सनदेंत अथवा दप्तरीं पाहतां कोठेंही वाघोली हा गांव वजा नाहीं. याचाही जबाब इकडुन जाला कीं सनदेंत अंदुरे तालुक्याची तनखा लिहिला, तो वाघोली गांव अलाहिदा वजा देऊन बाकी तालुक्याचा तनखा लाऊन सनद दिल्ही, यैसाही अर्थ सिद्ध होतो. तर्फेनचे जें पहिलें दिल्हें तें जिकडील तिकडे चालावें असा करार असतां वाघोलीस हरकत करूं नये. श्रीमंतांचें सरकारचे जाबसालास सदरील हा सवाल आमचा आहे. याचा जाबसाल सरकारी येकंदर जाबसालांत उगवावयाचा. वाघोलीस भारामलानीं लोक पो ते माघारे आणवावे दौलाचें म्हणणें कीं वाघोलीचा जाबसाल पुढें जसा ठरेल व जिकडे गांव वाजवी होईल तिकडे द्यावा. तों पावेतों वाघोली गांव अमानत, यैसा जिमा तुम्हीं आपला करून दस्त यैवज दिल्ह्यास लोक माघारे आणऊं'' आह्मी उत्तर केलें कीं “ यैसे दस्तयैवज कोठवर म्हणोन द्यावे ? गांव आमचे जिमे आहे. परंतु दस्तयैवज सिवाये लोक तेथुन आणऊं नयेत, यैसे ध्यान दिसण्यांत आलें,व कालहरणावर टाकुन बोलतात. मंटे व मालेगांव हे दोन ठाणीं रोशनखानानें घेतली. ते पोटी पडले. हुलीं वाघालीस शुरुवात केली. त्यास, वाघोली हा गांव सरकारचे दप्तरचे रुइनें वजाईत आहे किंवा कसें येविषीं यांसीं बोलण्यास आज्ञा होईल त्याप्रो बोलेन, येविषीचे उत्तरास आज्ञा सत्वर जाली पाहिजे. रा छ. २ माहे रावल हे विज्ञापना.