Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद व. ७ गुरुवार ते आश्वीन शु. २ सोमवार शके १७१५

अस्वबार छ १९ रोज सफर ता छ. १ रावलपर्यंत.
छ १० रावली डांकेवर.

श्री.
अश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.

श्रीमंत राजश्री --------- रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं------- -
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा। नमस्कार विनंती विज्ञपना. ता। छ१० माहे रावल मु बेदर येथें स्वामीचें कृपावलो नें करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी डांकेवर ता वार विनंती लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमान अलाहिदा पुरवणी पत्रीं विनंती लि आहे त्यावरून अवलोकनांत येईल उत्तरें रवाना व्हावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

विनंती विज्ञापना. शंकरराव जोग यांजकडे नवाबाकडून निर्मळ, इंदुर बोधन, वालकुंडा वगैरे माहाल नफुरुदौला मरहुम यांजबाबत होते. त्यास बाकीचा तोटा भारी. तालुके तमाम उज्याड. साल मारचे यैवजास देखील ठिकाण नाहीं. सबब दौलाची मर्जी शंकरराव यांजवर खपा होऊन तालुकियाचें जप्तीस स्वार व अमील यांची रवानगी पेशजीची झाली. सांप्रत, शंकरराव यांजकडील कुल तालुकियाचें काम मीरबदरुदीन हुसेंनखां पेशजी पागाबालें यांजकडील तालुकयाचे अमीलीस होते. त्याजकडे निभे तालुकियाचें काम व निमे तालुका व्यंकटराव सुरापुरकर यांजकडे. याप्रा आल हिदा दोनटुकड्यांकरून दोघांकडे सांगितल्या. शंकरराव यांचेकारकिर्दीची बाकीही तालुकियांत रुजु करून घेऊन वसूल करून सरकार दाखल करावी, व साल दरसाल नेमाप्रा यैवज पांवज्या करीत जावा. बेमुबलग बाकी राहूं न देतां कारस्तनींनें उगवा करून तालुक्याचा बंदोबस्त राखावा. सरकारकाम करावें. याप्रा उभयतांस ताकीद होऊन छ. ८ रावली दस-याचे दिवसीं रात्रीं मीरबदरुदीन व व्यंकटराव याचे पुत्र त्रिमलराव यांस बाहालीचें खिलत व खिताब व रुखसतीची पानदानें दौलांनीं नबाबांस अर्ज करून देवविलीं. या उपर बदरुदीन व व्यंकटराव यांचे पुत्र त्रिमलराव उभयतां तालुकियास दौलाचा निरोप घेऊन जाणार. येथुन रवाना जाले ह्मणजे मागाहून विनंति लिहिण्यांत येईल. रा॥ छ. १० माहे रावल हे विज्ञापना.