Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. शंकरराव भोगं यांचे तालुकियास जप्ती अमीन व स्वार नबाबांकडून पेशजी गेले, त्यांनीं इंदुर, बोधन वगैरे ठाणीं कितेक दाखल केलीं. शंकरराव यांस वर्तमान समजल्यावरून त्यांने, आरमुर येथील गढी मातबर त्याची हमेषा राहण्याची जागा. तेथे पांच सात हजार पैदल वगैरे जमियत जमा करून आरमूरची गढी व शंकराई पेठ वगैरे मकानें बलाविलीं. याचा बोभाट आल्यावरून, येथून भारामन तेजवंत यांस रवाना करण्याची योजना दौलांनीं करून नबाबास अर्ज केला. छ. ८ रा॥ वल दस-याचे दिवसीं रात्रीं भारमल यांस रुखसतीचें पानदान दिल्हें. याउपरी भारामल दौलाचा निरोप घेऊन जाणार, भारामल यांचें समागमें जमियत दाहा हजार पर्यंत जाणार. दौलाकडील रिसाल्याचे लोक व जमातदार, व मुतफर्कात जागीरदार लोक चडचणकर सिंदे वगैरेस हुकुम जाला. भारमल कुच करून येथून रवाना जाले ह्मणजे ता विनंती लिहिण्यांत येईल. भारमल यांस रुखसत समंई नबाबानीं जिगा व कलगी दोन अहद दिल्हे. रा छ, १० माहे रा। वल हे विज्ञापना.