Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.

विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग यांजकडे वातनीस दौलानीं आपला खिजमतगार सेखु पाठविला. त्यानें दौलांस लिहिलें कीं शंकरराव येथून निघोन भोसले यांजकडे जाणार. शंकराई पेठ व आरमुर या दोन ठाण्यांचा बंदोबस्त केला. चीजवस्तसुद्धां जाणार. यैसी बातमी लिहिल्यावरून दौलानीं भारमल यांस फौजसुद्धां येथून रवाना करण्याची तजवीज केली. नबाबाची रुखसत दस-याचे दिवशीं देविली. बाहेर डेरेही दिल्हे. दौलाचा मात्र निरोप घेणें बाकीस तो घेऊन कुच करणार, त्यास आज दुसरें पत्र सेखुचें दौलास आलें कीं। “ पहिलें मीं शंकरराव यांची चाल लिहिली होती. परंतु तें पाउल यांचें नाहीं. शंकरराव येथेंच आहे. कोठें गेला नाहीं; व परागंदा होण्याचा मनसबाही याचा दिसत नाहीं. हाजूरचे पत्र खातर जेमेनें येणें यैसें आल्यास हाजूर येतो." या अन्वयें पत्र आल्यावरून काल भारामलचे रवानगीची गडबड भारी होती, तसी जलदी आज दिसत नाहीं. शंकर रावा कडील विठलराव वकील येथें आहे. त्यासी व व्यंकटराव यासी गांठही घालून दिल्ही. शंकरराव यांस हाजूर येण्या विषयीं पत्रें रा होणार, इतक्यावर भारमल यांचे रवानगीचें कसें ठरतें तें मागाहून विनंती लिहितो. शंकरराव यांचीही पत्रें आजच दौलास आलीं आहेत. रा। छ, १० माहे रावल हे विज्ञापना.